शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अर्ध्या तासात पती-पत्नीचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 22:48 IST

कोरोनामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केवळ अर्ध्या तासात पती व पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलगासुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. रेशीमबाग येथील पुष्पांजली अपार्टमेंट येथे हे कुटुंब राहते. एकाच घरात दोघांचा मृत्यू व तिसरा पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देमुलगाही आला पॉझिटिव्ह : रेशीमबागेत भीतीचे वातावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केवळ अर्ध्या तासात पती व पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलगासुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. रेशीमबाग येथील पुष्पांजली अपार्टमेंट येथे हे कुटुंब राहते. एकाच घरात दोघांचा मृत्यू व तिसरा पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पतीचे वय ६६ तर पत्नी ६० वर्षाची होती. यापूर्वी मनीषनगरात पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.प्रभागाचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी सांगितले की, मृताचे इतवारी येथील धारस्कर रोडवर फुटवेअरचे दुकान होते. त्यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे जगनाडे चौकातील एका खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांना उपचारासाठी भरती केले होते. रुग्णालयात त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. सोमवारी रात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सोमवारी रात्री १०.३० वाजता त्यांच्या ३९ वर्षीय मुलाचा फोन आला की, आईचीसुद्धा प्रकृती अत्यवस्थ आहे.याचदरम्यान खासगी रुग्णालयात भरती असलेल्या त्यांच्या वडिलांना शिफ्ट करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मागविण्यात आली होती. परंतु अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत पोहचली नाही. सोमवारी रात्री १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्ध्या तासात घरी आजारी असलेल्या त्यांच्या आईचासुद्धा मृत्यू झाला. अवघ्या अर्धा तासात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलाला चांगलाच धक्का बसला. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले आहे. पती-पत्नीचे अंत्यसंस्कार मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू