लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार नागपूर येथील अॅड. अनिल किलोर व अॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती प्रदान केली असून शुक्रवारी राज्याचे मुख्य न्यायाधीशांनी त्यांना शपथ दिली. मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला.
नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:34 IST
मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला.
नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा
ठळक मुद्देअनिल किलोर, अविनाश घरोटे यांनी घेतली अतिरिक्त न्यायमूर्ती पदाची शपथ