शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

नागपुरात ५१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:35 IST

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते़ त्यानुसार महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून गेल्या चार दिवसांत ५१ अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे़

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशानुसार मनपाची कारवाई : चिखली येथे विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते़ त्यानुसार महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून गेल्या चार दिवसांत ५१ अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे़शहरातील धार्मिक अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका आणि नासुप्र यांनी अ‍ॅक्शन प्लॅन आठवडाभरात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारपासून कारवाई सुरू केली़ शहरात २००९ पूवीर्ची १ हजार ५२१ व २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत़ गेल्या चार दिवसांत ५१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली़सोमवारी हनुमाननगर झोन, नेहरूनगर झोन आणि धरमपेठ झोनअंतर्गत कारवाईत एकूण १५ अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले़ धरमपेठ झोन अंतर्गत तेलंखेडी, गोंडपुरा, अभ्यंकरनगर, अमरावती रोड येथील तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले़ हनुमाननगर झोनच्या पथकाने आयआरडीपी रोड मेडिकल चौक, तुकडोजी पुतळा, कॅन्सर हॉस्पिटलच्या बाजूचे मंदिर, छोटा ताजबाग, रघुजीनगर, एनआयटी कॉम्प्लेक्स, आदिवासीनगर, उदयनगर, हुडकेश्वर, मानेवाडा चौकातील सहा धार्मिकस्थळांचे अतिक्रमण काढले़ नेहरूनगर झोन येथील वृंदावननगर, सद्भावनानगर, जे. पी. कॉन्व्हेंट, अग्रेसिव्ह-ले-आऊट, रमणा मारोती, गणेशनगर, नंदनवन येथील एकूण सहा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले़ सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली़नासुप्रनेही केली कारवाईनासुप्र सभापती तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात सोमवारी धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करण्यात आली. मिनीमातानगर येथून सुरुवात करण्यात आली ज्यामध्ये दुर्गा माता मंदिर , गणेश मंदिर, कालीमाता मंदिर ,हनुमान मंदिर व शिवमंदिर, शंकरमंदिर आणि हनुमानमंदिर अशा सहा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण ४ टिप्पर आणि ३ जेसीबीच्या साहाय्याने दुपारी २.३० वाजेपर्यंत काढण्यात आली.५१चिखली येथे विरोधमौजा चिखली (देव), मिनीमातानगर भूखंड क्र. ६३१ (आराजी ५००० चौ. फूट) वरील धार्मिक अतिक्रमण काढण्यात आले़ स्थानिक नागरिकांनी मंदिराचे बांधकाम तोडण्यास तीव्र विरोध केला़ परंतु, नासुप्र अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सामंजस्याने प्रकरण सांभाळून नागरिकांची समजूत काढत अनाधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढण्यात आले. ही कारवाई पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी (पूर्व) भरत मुंडले आदींच्या नेतृत्वात करण्यात आली़

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर