शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या प्रदूषणाने नागपूरचे वातावरण झाले प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 20:34 IST

दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीत ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले.

ठळक मुद्देढगाळ वातावरणामुळे पडली प्रदूषणात अधिक भर : प्रदूषण मानकांनुसार शहर डेंजर झोनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीत ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील सिव्हिल लाईनच्या प्रदूषणाची मात्रा नोंदविली. यात रात्री १२ वाजता सिव्हिल लाईन भागातल्या प्रदूषणाची मात्र प्रचंड वाढलेली दिसली. प्रदूषण मानकानुसार सिव्हील लाईनचे रात्री वाजताचे वातावरण ‘व्हेरी पुवर’ म्हणून नोंदल्या गेले. रात्री बारानंतर सिव्हिल लाईनचा एअर क्वॉलेटी इंडेक्स ३२६ वर गेला होता. जो मानवासाठी अपायकारक ठरतो. 

देशामध्ये १०२ शहरांची वायु प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट आहे. यात नागपूरचा सुद्धा समावेश आहे. शहराच्या वायु प्रदूषणात सर्वात मोठा घटक हा पार्टिक्युलेट मॅटर चा आहे. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे छोटेछोटे धुळ कण जे २.५ मायक्रोन पेक्षा कमी व २.५ ते १० मायक्रॉनपर्यंत असतात. यात सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॉक्साईड, अमोनिया, शिसा, आर्सेरिक, निकल, ओझोन, कार्बन मोनोक्साईड असा १२ घटकांचा समावेश असतो. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे वातावरणातील वायु प्रदूषण या घटकांच्या आधारेच नोंदविते. त्यानुसार शहराचा एअर क्वॉलेटी इंडेक्स नोंदविण्यात येतो. गेल्या काही वर्षात दिवाळीच्या दिवशी शहरातील एअर क्वॉलिटी इंडेक्स प्रदूषण नियंत्रण मंडळ नोंदविले. यात २०१६ मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स १३८ पर्यंत पोहचला होता. २०१७ मध्ये १८२ पर्यंत पोहचला होता. २०१८ मध्ये २२२ व रविवारी मध्यरात्री नागपूर शहरातील सिव्हिल लाईन्सचा एअर क्वॉलिटी इंडेक्स ३५३ एवढा नोंदविण्यात आला. एअर क्वालिटी इंडेक्सचा आकडा २०० च्या वर गेल्यास प्रदूषणाची स्थिती गंभीर होते.शहरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत असलेले बांधकामामुळे पार्टिक्युलेट मॅटरची मात्रा जास्त आहे. त्याचबरोबर शहराच्या परिसरात थर्मल पॉवर प्लॅण्ट सुद्धा आहे. त्यामुळे शहरात पार्टिक्युलेट मॅटर आधीच आहे. अशात फटाक्यांच्या फुटण्यामुळे यात आणखी भर पडते.दिवाळीत फॅन्सी फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात येतात. हे फटाके हवेत प्रदूषण पसरवतात. त्याचा थेट परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. फॅन्सी फटाके रसायनांचा वारेमाप वापरामुळे अधिक आकर्षक दिसतात. कारण जेवढे जास्त रसायन, तेवढे रंग अधिक असतात. मात्र, हे फुटल्यानंतर वातावरणातील कार्बन आणि सल्फरचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.म्हणून झाले वातावरण अधिक प्रदूषितरविवारी रात्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील वातावरण ढगाळ होते. त्यातच पाऊसही पडला. पण फटाक्यांचा जोर कमी झाला नाही. ढगाळ वातावरणामुळे माईश्चर जास्त होते. हवा अजिबात नव्हती. त्यामुळे फटाका फुटल्यानंतर प्रदूषण एकाच जागी स्थिरावले. रात्रीला थंडी पडल्यामुळे धुक्यासारखे वातावरण झाले. फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाला वातावरणाबाहेर पडता आले नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये जसे स्मॉगसारखे वातावरण असते, तसा अनुभव नागपूरकरांना सोमवारी पहाटे आला. आणि ते घातक ठरले.केंद्रीय प्रदूषण विभागाने सिव्हिल लाईन्सचा प्रदूषणाचा डेटा घेतला आहे. सिव्हिल लाईन्समध्ये एअर क्वॉलेटी इंडेक्स ३५३ वर आढळला. तसा सिव्हिल लाईन्स परिसर पर्यावरण पूरक परिसर आहे. झाडे मोठ्या प्रमाणात आहे. मोकळा परिसर आहे. फटाकेही येथे फार कमी फुटतात. अशातही प्रदूषणाची ही अवस्था आहे. इतवारी, महाल, गांधीबाग, सीताबर्डी या भागात प्रदूषणाची लेव्हल नक्कीच वाढले असेल.कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हीजिल फाऊंडेशन

टॅग्स :Crackersफटाकेpollutionप्रदूषणnagpurनागपूर