शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हायरल’ने उपराजधानी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:24 IST

उपराजधानी व्हायरल तापाने फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह खासगी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलसह खासगीमध्ये वाढले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील बदलांचा प्रभाव शरीरावर पडू लागला आहे. विशेषत: लहान मुले व वृद्ध व्हायरलचा म्हणजे विषाणूजन्य तापाच्या विळख्यात सापडत आहे. उपराजधानी व्हायरल तापाने फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासह खासगी इस्पितळांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.पावसाची उघडझाप, सततचे ढगाळ वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. तापासोबतच सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडत आहेत. औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. यातच डेंग्यूसदृश आजाराच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. मेडिकल आणि मेयो या शासकीय रुग्णालयात या आजाराचे दिवसाकाठी १५-२० रुग्ण येत आहेत. पाऊस लांबल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्हायरलसोबतच डेंग्यू, मलेरिया, कावीळ, अतिसार व विषमज्वराचे रुग्णही दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

श्वासांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे जंतू संक्रमिततज्ज्ञाच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रिम, कोल्डड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फैलावतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होत असल्याने एकाच घरात ‘व्हायरल फिव्हर’चे एकपेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.स्वत:हून औषधे घेणे टाळा‘व्हायरल’ असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु या सोबतच डेंग्यूसदृश लक्षणे असलेले रुग्णही दिसून येत आहे. यामुळे कुठल्याही तापावर स्वत:हून औषधे घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करा. आराम करा. ‘व्हायरल’ रुग्णांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्या. स्वच्छता पाळा. ताजे व घरचे अन्नच घ्या.-डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्य