शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

रामटेकमध्ये शिवसेनेच्या जयस्वालांनी गाव राखले, मात्र कॉंग्रेसने मैदान मारले 

By जितेंद्र ढवळे | Updated: November 6, 2023 15:10 IST

Nagpur Gram Panchayat Election Results : राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर आ.जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात २८ ग्रा.पं.च्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस असा थेट सामना झाला. यात शिवसेनेचे आ.आशिष जयस्वाल यांचे मुळ गाव असलेल्या काचुरवाही ग्रा.पं.च्या सरपंचपदी शिवसेनेच्या सविता सुभाष नागोसे यांनी कॉंग्रेस समर्थित आघाडीचे किरण धीरज पानतावणे यांचा पराभव केला. 

जयस्वाल यांनी गाव राखले असले तर रामटेक तालुक्यात कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात जोरदोर मुसंडी मारली आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर आ.जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र रामटेक तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीत मतदारांनी शिंदे यांच्या सेनेला नाकारल्याचे चित्र आहे. येथे महादुला ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे शरद डडुरे विजयी झाले. भंडारबोडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेच्या सुनिता रमेश मिसार, बोरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसच्या प्रेमलता राजेंद्र कंगाली, डोंगरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी मनिषा प्रमोद माकडे (कॉंग्रेस) तर बोथिया पालोरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी कॉंग्रेसच्या छाया रोशन भट्टी विजयी झाल्या आहेत. 

काट्याची टक्कर झालेल्या खैरी बिजेवाडा ग्रा.प.च्या सरपंचपदी कॉंग्रेसचे रणवीर यादव विजयी झाले आहे. रणवीर कॉंग्रेस नेते उदयसिंग यादव यांचे धाकटे बंधू आहेत. खनोरा ग्रा.पं.च्या सरपंच पदी कॉंग्रेसच्या सरला तुळसीराम खंडाते, हिवराबाजार ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपा रत्नमाला राजेश जजस्वाल विजयी झाल्या तर सराखा बोर्डा ग्रा.पं.च्या सरपंचपदी अपक्ष तुळसीराम राऊत यांनी बाजी मारली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnagpurनागपूर