नागपूर पदवीधर मतदार संघ; २८ टक्के मतदार घटले, धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:37 AM2020-11-19T11:37:58+5:302020-11-19T11:40:24+5:30

Nagpur Graduate Constituency नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये नागपूर पदवीधर मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २८ टक्के मतदार घटले आहेत.

Nagpur Graduate Constituency; Voter turnout dropped by 28 per cent | नागपूर पदवीधर मतदार संघ; २८ टक्के मतदार घटले, धाकधूक वाढली

नागपूर पदवीधर मतदार संघ; २८ टक्के मतदार घटले, धाकधूक वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देदोन लाखांहून अधिक मतदार ३२० पोलिंग बूथवर होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : न्यायालयाच्या निर्देशानंतर नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने बनविण्यात आल्या आहेत. नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २८ टक्के मतदार घटले आहेत. मतदारसंख्या कमी झाल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या घटलेल्या आकड्याचा फटका बसेल की फायदा होईल याचे अंदाजदेखील मांडले जात आहेत.

मागील निवडणुकीच्या वेळी २ लाख ८८ हजार २२३ मतदार होते. यंदा त्यात ८१ हजार ७६९ मतदारांची घट झाली आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत २ लाख ६ हजार ४५४ मतदार मतदान करणार आहे. त्यासाठी ३२० मतदान केंद्र तयार करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

Web Title: Nagpur Graduate Constituency; Voter turnout dropped by 28 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.