शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपूर पदवीधर मतदारसंघ; महाविकासआघाडीचे अभिजित वंजारी बहुमताने विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 2:27 PM

Nagpur News Nagpur graduate constituency विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडीचे अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडीचे अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये 17व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार  अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. 17 व्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांना 61 हजार 701 तर भाजपचे संदीप जोशी यांना 42 हजार 791 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 60 हजार 747 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. मतदारांनी दिलेल्या या कौलाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस व महाआघाडीला निश्चितच होईल असा विश्वास अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला आहे.  गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत वंजारी यांनी ४ हजार ८५० मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीत वंजारी यांना १२,६१७ तर जोशी यांना ७,७६७ मते मिळाली. दुस?्या फेरीतही वंजारी यांच्या मताधिक्यात २ हजार ४१२ ची भर पडली. दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५१ हजार २३१ मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यातील तब्बल ४ हजार ७६९ मते अवैध ठरली. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या दिग्गज व नामवंत नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आजवर हा मतदारसंघ भाजपने एकतर्फी जिंकला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे व या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले यांचे तिकीट कापत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना संधी देण्यात आली. या मतदारसंघात भाजपची व्होट बँक पक्की आहे. उमेदवार बदलला तरी काहीच फरक पडत नाही, असा दावा भाजपची रणनीती आखणाऱ्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र, तिसऱ्या फेरीअखेरही भाजपची पीछेहाट पाहता रणनीती फसल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकAbhijit Wanjariअभिजीत वंजारी