शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीत संशयास्पद मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:07 IST

जरीपटक्यातील एका गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे ट्रॅक येथे संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी पहाटे रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला. अमरावती पोलीस तपास करीत आहेत.

ठळक मुद्दे रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील एका गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे ट्रॅक येथे संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी पहाटे रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला. अमरावती पोलीस तपास करीत आहेत. कपिल देव झामानी (३४) रा. दयालू सोसायटी जरीपटका असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. कपिल यांचे कमाल चौकात समाधा गारमेंट नावाचे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपिल मागील काही दिवसांपासून त्रस्त होता. तीन दिवसांपूर्वी तो घरून बाहेर पडला. तेव्हापासून त्याचा काही पत्ता नाही. सुरुवातीला कुटुंबीयांना वाटले की, दिवाळीच्या खरेदीसाठी तो बाहेर गेला असावा. संपर्क केल्यावर त्याचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ असल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. बुधवारी पहाटे चांदूर बाजार रेल्वे ट्रॅकजवळ कपिलचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. अमरावती पोेलिसांनी कपिलच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय अमरावतीला पोहोचले. पोस्टमार्टेमनंतर कपिलच्या मृतदेहासह कुटुंबीय बुधवारी सायंकाळी नागपूरला पोहोचले.कपिलने आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही विपरीत घडले, याबाबत चांदूर बाजार रेल्वे पोलीस सध्याच काही सांगण्याच्या स्थितीत नाही. तपास सुरू आहे. कपिलचा गारमेंंटचा व्यवसायही चांगला सुरू होता. त्याचे कुटुंबीयसुद्धा सामान्य घरातील आहेत. त्याचे कुटुंबीय अनेक वर्षांपूर्वीच नागपुरात राहताहेत. कुटुंबात पत्नी, मुलगा-मुलगी, दोन भाऊ आणि आई-वडील आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का पोहोचला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू