लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडीतील एका तरुणीसह चौघांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे राहणारी नगमा ऊर्फ पूजा मनोज शाहू (वय १९) हिने बुधवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आरती मनोज शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरूनगरात राहणाऱ्या संगीता कुणाल कांबळे (वय २८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी याप्रकरणी कुणाल गुलाबराव कांबळे यांची तक्रार नोंदवून घेत हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. लकडगंजमधील जुना बगडगंज परिसरात राहणारे चेतन सोनबाजी नागपुरे यांनी बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास गळफास लावून घेतला. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.त्याचप्रमाणे जरीपटक्यातील कामठी मार्गावर राहणारे शिवराज नारायण ईनकेश्वर (वय ४१) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. राजश्री शिवराज ईनकेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.गळफास लावण्याचा घटना वाढल्यालॉकडाऊनच्या काळात गळफास लावून आत्महत्या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. घरगुती वाद, बेरोजगारी, नैराश्य आदी कारणातून अशा घटना सारख्या वाढत असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.
नागपुरात तरुणीसह चौघांनी लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 21:16 IST
कोराडीतील एका तरुणीसह चौघांनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे राहणारी नगमा ऊर्फ पूजा मनोज शाहू (वय १९) हिने बुधवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
नागपुरात तरुणीसह चौघांनी लावला गळफास
ठळक मुद्देएकाच दिवशी घडल्या घटना