शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मास्क न वापरणाऱ्यांकडून ४५ लाखाची दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 01:21 IST

सुरक्षित अंतर राखणे व मास्क परिधान करणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याचे पालन करीत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकट्या ग्रामीण भागातच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत तब्बल ४५ लाख रुपयाचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतालुका व गावपातळीवर कारवाई : दुकानांचीही नियमित तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शासन व प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. सुरक्षित अंतर राखणे व मास्क परिधान करणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याचे पालन करीत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकट्या ग्रामीण भागातच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत तब्बल ४५ लाख रुपयाचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यासाठी शासन व प्रशासनाकडून काही दिशानिर्देश जारी केलेले आहेत. सामान्य नागरिकांसाठी नियम घालून देण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे आणि इतरांसोबत सुरक्षित अंतर ठेवणे हा होय. परंतु अनेक लोक या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनातर्फे अशा लोकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. शहरासोबतच तालुकास्तरावर आणि अगदी गावपातळीवरही कारवाई केली जात आहे. यासोबतच दुकानांचीही नियमित तपासणी केली जात आहे. दुकानांमध्ये गर्दी होत आहे का, नियमांचे पालन केले जात आहे का, वेळेवर दुकाने बंद केली जातात का, आदींची तपासणी केली जात असून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तालुका व गावपातळीवर राबविण्यात आलेल्या या कारवाईतून आतापर्यंत ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.मास्क लावा, स्वत:ची काळजी घ्याकोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर