शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  सासऱ्याने केली जावयाची बेदम धुलाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 21:58 IST

पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी सासऱ्याच्या घरी गेलेल्या तरुणाला त्याच्या सासऱ्याने बेदम मारहाण केली. जबर जखमी झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून सासऱ्याने जावयाला एका खोलीत डांबून ठेवले. कशीबशी सुटका करून जावई डॉक्टरकडे पोहचला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देखोलीत डांबून ठेवले : यशोधरानगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी सासऱ्याच्या घरी गेलेल्या तरुणाला त्याच्या सासऱ्याने बेदम मारहाण केली. जबर जखमी झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून सासऱ्याने जावयाला एका खोलीत डांबून ठेवले. कशीबशी सुटका करून जावई डॉक्टरकडे पोहचला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरा गांधीनगर आहे. तेथील रहिवासी नाना सीताराम रामटेके (वय ३५) याचा त्याच्या पत्नीसोबत काही दिवसांपूर्वी घरगुती वाद झाला. त्यामुळे नानाची पत्नी आपल्या मुलीला घेऊन रागाच्या भरात माहेरी गेली. तिचे वडील नागसेनवन नगरात राहतात. राग शांत झाल्यानंतर १२ जुलैच्या रात्री ८.३० च्या सुमारास नाना रामटेके त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला. यावेळी सासरा नरेंद्र नितनवरे (वय ५२) याच्यासोबत नानाचे कडाक्याचे भांडण झाले. जावई आपल्या घरी येऊन भाईगिरी करीत असल्याचे पाहून आरोपी सासरा नितनवरे याने लाकडी बत्त्याने नानाला बदडणे सुरू केले. पाठीवर, हातावर, नाकातोंडावर तसेच डोक्यावर फटके हाणून नितनवरेने नानाला जबर जखमी केले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जाऊ नये म्हणून त्याला आपल्या घरातील एका खोलीत डांबून ठेवले. या घटनेची तक्रार नानाने यशोधरानगर पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी आरोपी सासºयाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी नितनवरे हा आॅटोचालक असून, जखमी नाना भाजी विक्रेता असल्याचे पोलीस सांगतात.म्हणून झाला विलंब१२ जुलैच्या रात्रीच्या घटनेची तक्रार तब्बल आठ दिवसांनंतर नोंदविण्याचे कारण पोलिसांनी नानाला विचारले असता नानाने आपल्या जखमा पोलिसांना दाखवल्या. सासऱ्याने असे काही बदडले की नानाच्या सर्वांगावर सूज आली होती. ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्या रात्री सासऱ्याने खोलीत डांबून ठेवल्याने तो असहाय झाला होता. सकाळी सासऱ्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर नानाने रुग्णालयात धाव घेतली. तेथे आठवडाभर उपचार करून घेतले. आता बरे वाटत असल्यामुळे आपण ठाण्यात आल्याचे नानाने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर