शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: उद्योजकांना वीज सबसिडीची प्रतीक्षा, मार्चनंतर योजना बंद होणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 24, 2024 20:25 IST

Nagpur: विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांचा विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांना वार्षिक १,२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी दिली होती. परंतु, काही मोठ्या उद्योगांच्या गैरवापरामुळे ही सबसिडी ६०० कोटींपर्यंत कमी केली.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांचा विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांना वार्षिक १,२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी दिली होती. परंतु, काही मोठ्या उद्योगांच्या गैरवापरामुळे ही सबसिडी ६०० कोटींपर्यंत कमी केली. आता ही योजना यावर्षी मार्चला संपणार आहे. मागणीनंतरही सरकारने योजनेकडे कानाडोळा केल्याचे चित्र असून उद्योजकांना वीज सबसिडीची प्रतीक्षा आहे.

आधी मिळायची प्रति युनिट १ ते १.२५ रुपया सबसिडी!योजना सुरू झाली तेव्हा विदर्भ आणि मराठवाडा भागातील उद्योगांना प्रति युनिट १ ते १.२५ रुपयांचा लाभ मिळायचा. त्याचा उद्योगांना फायदा झाला होता. शिवाय या भागात नवीन उद्योग सुरू झाले होते. परंतु २०२२ नंतर सबसिडी ५० ते ६० पैशांपर्यंत कमी झाली आणि योजनेत काही नियम व अटी टाकण्यात आल्या. त्या उद्योजकांसाठी समस्या ठरल्या. वीज महाग मिळू लागली. त्यामुळे या भागात गुंतवणूक कमी झाली. कमी वीजदरामुळे काही उद्योजकांनी उद्योग लगतच्या राज्यात स्थलांतरित केले.

सबसिडी निधी वाढविण्याची मागणीसबसिडी निधी वाढविण्याची मागणी उद्योजकांनी सरकारकडे वारंवार केली. पण त्याकडे सपशेल कानाडोळा केल्याचे चित्र आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने (व्हीआयए) हा प्रश्न वारंवार सरकार दरबारी मांडण्यात आला. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात चारदा निवेदने देण्यात आली. सबसिडी कमी करण्यात आल्याने उद्योजकांचा उत्पादन खर्च वाढला. उद्योग अजूनही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या स्थितीत आहे. विशेषत: स्टील आणि सिमेंट उद्योगांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगाना या राज्यात कमी गुंतवणुकीत उत्पादन होत आहे. त्यामुळे या उत्पादनांना जास्त मागणी आहे.

मार्चअखेर योजना संपणारदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना अभ्यासानंतर ही योजना सुरू करण्यात आली होती. ८ ते १० मोठ्या उद्योजकांनी गैरफायदा घेतल्यानंतर सरकारने निधी कमी केला. काही उद्योजकांमुळे संपूर्ण उद्योग क्षेत्राला योजनेचा फटका बसला. विशेषत: लहान आणि जास्त विजेची खपत असलेल्या कंपन्या संकटात आल्या. ही योजना यावर्षी मार्चला संपत आहे. या तारखेनंतर काय होणार, हे स्पष्ट नाही. सरकारने आतापासून यावर चर्चा करावी आणि पुढील पाच वर्षे ही योजना वाढवावी. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा भागातील उद्योगांना संजीवनी मिळेल आणि उद्योजकांमधील संभ्रम दूर होईल.

योजना पुढेही सुरू ठेवावी, सबसिडी निधी वाढवावावीज सबसिडी योजना मार्चअखेर संपणार आहे. ही योजना पुढेही सुरू ठेवून सबसिडी वाढविण्यासाठी असोसिएशनने दोनदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने दिली आहेत. त्यांनी या योजनेबाबत बजेटमध्ये तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील आठवड्यात पुन्हा उपमुख्यमंत्र्याची भेट घेणार आहोत. योजनेमुळे विदर्भातील उद्योगांचा नक्कीच विकास होईल.- नितीन लोणकर ( अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन)

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर