शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

नागपूर कामगार विमा रुग्णालय : बंद पॅथालॉजी तंत्रज्ञानाच्या वेतनावर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:41 IST

एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा कारभाराचा बोजवारा उडाला आहे.

ठळक मुद्देयंत्रसामुग्री व रसायनच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा कारभाराचा बोजवारा उडाला आहे.कामगार विमा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. नवी पद भरती होत नसल्याने कार्यरत डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. अद्ययावत यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठविले जात आहे. यातही संबंधित रुग्णालयाचे देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने खासगी रुग्णालये सेवा देणे बंद करीत आहे. उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे.प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात तंत्रज्ञाची पदे शासनाकडून भरण्यात न आल्यामुळे मागील १० वर्षांपासून या विभागाची ‘आऊटसोर्सिंग’ सुरू आहे. ‘रेनबो ब्लड बँक’ या खासगी पॅथालॉजीला रुग्णालयाच्या रुग्णाचे नमुने पाठविले जात आहे. वर्षभरापूर्वी रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात शासनाने दोन तंत्रज्ञ व तीन सहायक तंत्रज्ञ अशी पाच तंत्रज्ञांची भरती केली. परंतु, अत्याधुनिक यंत्रसामुग्री व रक्त तपासणीचे रसायन उपलब्धच करून दिले नाही. यामुळे या तंत्रज्ञांच्या हाताला कामेच नाही. यांच्या वेतनांवर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. खासगी पॅथालॉजीचा कर्मचारी रुग्णालयात येऊन रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन जातात. मग, तंत्रज्ञाची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पैशाची उधळपट्टी कधी थांबणार?एका तंत्रज्ञाचे साधारण ४० हजार रुपये वेतन, तर सहायक तंत्रज्ञाचे २५ ते ३० हजार वेतन आहे. रुग्णांना कवडीचाही फायदा होत नसताना शासनाकडून दर महिन्याला पाच तंत्रज्ञांच्या वेतनावर मात्र लाखो रुपये खर्च होत आहे. ही कामगारांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे.काही तपासण्या केल्या जातातसामान्य तपासण्या रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात तंत्रज्ञकडून केल्या जातात. यात ‘रेडी किट’ची मदत घेतली जाते. उर्वरित ‘आऊटसोर्सिंग’द्वारे केल्या जातात. रुग्णालयाकडून लवकरच कंत्राटी पद्धतीवर पॅथालॉजिस्ट घेण्यात येणार आहे.डॉ. मीना देशमुखवैद्यकीय अधीक्षक, कामगार विमा रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी