शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरात हुंड्याने घेतला नवविवाहितेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:03 IST

तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या नवविवाहितेने हुंड्यासाठी हपापलेल्या सासरच्या मंडळींच्या त्रासापायी आत्महत्या करून जीवन संपविले. चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी नवविवाहितेचा पती आणि त्याचे तीन नातेवाईक अशा चौघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलग्नानंतर तीनच महिन्यात केली आत्महत्या : पतीसह चौघे आरोपी : गिट्टीखदान पोलिसांकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या नवविवाहितेने हुंड्यासाठी हपापलेल्या सासरच्या मंडळींच्या त्रासापायी आत्महत्या करून जीवन संपविले. चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे गिट्टीखदान पोलिसांनी नवविवाहितेचा पती आणि त्याचे तीन नातेवाईक अशा चौघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.प्रियंका सौरभ पटेल (वय २०) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा पती आरोपी सौरभ रामकैलास पटेल, गीता रामकैलास पटेल, प्रियंका शिवपूजन कोठारे आणि रामकैलास तेजा पटेल अशी आरोपींची नावे आहेत. पांढराबोडी परिसरात राहणाऱ्या प्रियंका हिचा २६ फेब्रुवारी २०२० ला गिट्टीखदान मधील सुरेंद्रगड परिसरात राहणाºया सौरभ पटेल सोबत विवाह झाला होता. वैवाहिक जीवनाचे गुलाबी स्वप्न मनात घेऊन सासरी नांदायला आलेल्या प्रियंकामागे तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तगादा लावला. तिला टोचून बोलणे, मानसिक त्रास देणे सुरू झाले. अवघ्या तीनच महिन्यात सासरच्या मंडळींनी तिला जीव नकोसा करून टाकला. त्यांचा जाच असह्य झाल्यामुळे प्रियंकाने २१ मेच्या दुपारी ३.४५ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलीस तपासात प्रियंकाच्या आत्महत्येला तिचा पती आणि उपरोक्त आरोपी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. सासरच्या मंडळीमुळेच प्रियंकाने गळफास लावून घेतला, अशी तक्रार नीरज जगदीश पटेल ( वय २२, रा. पांढराबोडी, अंबाझरी) यांनी पोलिसांकडे नोंदविली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी उपरोक्त आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :dowryहुंडाDeathमृत्यूnagpurनागपूर