शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

नागपूर विभागात कॉपीचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 21:54 IST

गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये ९४ कॉपीची प्रकरणे आढळली असून यामध्ये ९३ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी १५४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे९३ कॉपीबहाद्दर दोषी : गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये ९४ कॉपीची प्रकरणे आढळली असून यामध्ये ९३ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी १५४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.परीक्षा काळात मंडळातर्फे भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यात येत होती. विभागात १५५ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. यातील १५४ जण दोषी आढळले, तर एका विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ४६ विद्यार्थी दोषी आढळून आले. तर मागील वर्षी सर्वाधिक कॉपी सापडलेल्या वर्धा जिल्ह्यात केवळ तीनच विद्यार्थी पकडल्या गेले.भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी कॉपीची प्रत्येकी २४ प्रकरणे आढळली होती. यंदा मात्र हे प्रमाण प्रत्येकी अनुक्रमे १० व ८ इतके आहे.नागपूर जिल्ह्यात ९ कॉपीबहाद्दर सापडले.उत्तरपत्रिकांवर आपला मोबाईल क्रमांक, गुण देण्यासाठी विनंती, धमकी इत्यादी लिहिणारे काही विद्यार्थी असतात. परीक्षा झाल्यानंतर मूल्यांकनाच्या वेळी अशी ३५ प्रकरणे आढळून आली. यातील केवळ एकच विद्यार्थी दोषी ठरला आहे.दोषींची आकडेवारीजिल्हा       संख्या (२०१८)         संख्या (२०१७)भंडारा           १०                       २४चंद्रपूर            ८                        २४नागपूर           ८                         १वर्धा                ३                       ६०गडचिरोली      ४६                    १२गोंदिया          १८                      ३३एकूण           ९३                     १५४वर्षनिहाय कॉपीची प्रकरणवर्ष                   कॉपी२०१५              ११२२०१६             ७५२०१७             १५४२०१८             ९४

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८nagpurनागपूर