शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मालवाहतुकीत ‘नंबर वन’

By नरेश डोंगरे | Updated: August 4, 2025 19:55 IST

धावते रेल्वे, वाढते उत्पन्न : एकट्या जुलै महिन्यात ३३३ कोटींचं उत्पन्न : नवीन मालवाहतुकीतही भर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने मालवाहतुकीच्या क्षेत्रात यंदा भरीव यश मिळवत आर्थिक प्रगतीचा एक नवा टप्पा गाठला आहे. एकट्या जुलै महिन्यात एकूण ८३१ रॅक लोड करून तब्बल ३३३.५८ कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. विशेष म्हणजे, यंदा मालवाहतुकीच्या एका नव्या प्रकारातही भर पडली आहे.

कोळसा, सिमेंट, लोखंड, कंटेनर आणि दुसऱ्या वेगवेगळ्या वस्तू, साहित्याची नागपूर विभागातून मोठ्या प्रमाणात रेल्वेने मालवाहतूक केली जाते. जास्तीच्या सोयी दिल्या आणि उत्पादक कंपन्या, संस्थांना सोबत घेतले तर मालवाहतुकीत आणखी भर घालता येईल. परिणामी रेल्वेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात गंगाजळी जमा करता येईल, हे ध्यानात घेऊन रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या योजना, उपक्रम सुरू केले आहे. त्याचे चांगले परिणाम समोर येत असून, गेल्या १ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारची मालवाहतूक करून रेल्वेने ३३३ कोटी, ५८ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच बल्लारशाह येथून 'आयरन पेललेटस्' (लोह धातूचे रुपांतरित स्वरूप)ची वाहतूक करून रेल्वेने मालवाहतुकीच्या एका नव्या प्रकारात भर घातली आहे. आयरन पेललेट्सच्या ८ रॅकची वाहतूक करून रेल्वेने ५ कोटी, ४२ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. 

वस्तूनिहाय मालवाहतुकीचे स्वरूप

  • कोळसा वाहतूक : ५६९ रॅक, २४०.७४ कोटींचे उत्पन्न.
  • लोहधातू वाहतूक : ४१ रॅक, ३०.११ कोटी (गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात १२२ टक्के वाढ).
  • गूळ : २ रॅक, १.३३ कोटी (गेल्या वर्षीच्या तुलनेत १४७ टक्के वाढ),
  • फेरो मॅग्निज : २ रॅक, ९२ लाख (४४ टक्के वाढ),
  • कंटेनर : ११० रॅक, १७. ३८कोटी (१४ टक्के वाढ),
  • क्लिंकर : ३४ रॅक, १९.८९ कोटी (१०० टक्के वाढ),
  • आयरन स्लॅग : १३ रॅक, ४.९१ कोटी (११५५ टक्के वाढ) गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची भर

 

मालवाहतूकच्या या प्रगतीमागे उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा, कामकाज सुलभीकरण आदींसोबतच स्थानिक उद्योजकांशी संपर्क करून त्यांना दिलेला विश्वास कारणीभूत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ७८८ रॅक लोड करून २९६.१४ कोटींचे उत्पन्न मिळवले होते. यावर्षी त्यात १३ टक्क्यांची भर पडली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे