शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात एसटीचा शैक्षणिक पास महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 09:59 IST

एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देदरवाढीचा २५ हजार विद्यार्थ्यांना फटका सरकार देणार का दिलासा?

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. दुसरीकडे यातील काही विद्यार्थी बिकट परिस्थितीमुळे एसटीचा पास काढू शकणार नसल्याने ते शिक्षणालाच मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.डिझेलच्या दरवाढीचे कारण पुढे करत एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासी भाड्यात १५ जूनपासून १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. या निर्णयाचा नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. नागपूर जिल्ह्यात गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर, सावनेर, काटोल, रामटेक, उमरेड या आठ डेपोतून महिन्याकाठी सरासरी २५ हजार ३८१ विद्यार्थी एसटीचा पास काढून शिक्षणासाठी ये-जा करतात. यात एसटी महामंडळ शाळेचा सही, शिक्का सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना ६६.६६ टक्के सवलत देऊन त्यांच्याकडून फक्त ३३.३३ टक्के रक्कमच वसूल करते.या सवलतीमुळे विद्यार्थ्यांना एसटीचा पास काढून प्रवास करणे परवडते. परंतु भाडेवाढीच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचा पास महागणार आहे. यातील काही विद्यार्थी नरखेडसारख्या सर्वाधिक आत्महत्या केलेल्या भागातील आहेत. आधीच परिस्थिती अभावी कसेबसे शिक्षण घेत असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना या भाडेवाढीमुळे भुर्दंड बसणार असून त्यांच्यावर शिक्षणाला मुकण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे महामंडळाने विद्यार्थ्यांना या भाडेवाढीतून वगळण्याची गरज आहे.

शिक्षण विभागाची सूट, एसटीची लूटदुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शासनाकडून परीक्षा शुल्कात सूट देण्यात येते. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. परंतु, आता एसटीने केलेल्या भाडेवाढीमुळे विद्यार्थ्यांच्या पासचे शुल्क वाढणार असून त्यांची मोठी लूट होणार आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ