नागपूर : नागपूर जिल्हात मागील पाच वर्षामध्ये वाघ किंवा बिबट या प्राण्यांकडून मनुष्यहानी झाल्याची नोंद वन विभागाकडे नाही. मात्र या काळात रानडुक्कर, नीलगाय आणि लांडगा या प्राण्यांकडून मनुष्यहानी झाली. त्याबदल्यात संबंधितांना नुकसानभरपाईपोटी या पाच वर्षात ८९ लाख रुपयाची मदत वन विभागाने केली आहे. २०१५ ते नोव्हेंबर २०२० या पाच वर्षांच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवनी, दक्षिण उमरेड, सेमिनरी हिल्स आणि नरखेड या वन परिक्षेत्रामध्ये या घटना घडल्याची नोंद आहे. सर्वाधिक घटनांची नोंद रानडुकरांमुळे आहे. फक्त एका घटनेत नीलगाईमुळे व दुसऱ्या घटनेत लांडग्यामुळे मनुष्यहानी झाली आहे.
वर्ष वनपरिक्षेत्र प्राणी नुकसानभरपाई
२०१५ रामटेक अप्राप्त ५ लाख रु.
२०१६ पारशिवनी रानडुक्कर ८ लाख रु.
२०१७ द.उमरखेड नीलगाय ८ लाख रु.
२०१७ हिंगणा रानडुक्कर ८ लाख रु.
२०१८ सेमिनरी हिल्स रानडुक्कर १५ लाख रु.
२०१९ सेमिनरी हिल्स रानडुक्कर १५ लाख रु.
२०२० रामटेक रानडुक्कर १५ लाख रु.
२०२० नरखेड रानडुक्कर १५ लाख रु.
एकूण