शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. आरोग्य विभागाच्या १०२ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचे वाहनचालक जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:19 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ क्रमांकावर आपत्कालीन सेवा देणारे वाहनचालक सोमवार १८ डिसेंबरपासून संपावर जाणार आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतनागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ क्रमांकावर आपत्कालीन सेवा देणारे वाहनचालक सोमवार १८ डिसेंबरपासून संपावर जाणार आहे. जि.प.च्या ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ वाहनचालक कार्यरत आहे. यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने, त्यांनी संप पुकारला आहे.ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणारे हे वाहन चालक कंत्राटी कामगार आहे. जिल्हा परिषदेने नागपूर ग्रामीण युवक बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तुमसर यांना वाहन चालक पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. ग्रामीण भागातील ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात हे वाहनचालक २४ तास रुग्णसेवा पुरवित आहे. कंत्राटदाराने या वाहनचालकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी वेतनासाठी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचा आरोप आहे की, कंत्राटदार संस्थेकडून वाहनचालकांची अडवणूक करण्यात येते. कंत्राटदार संस्थेला प्रति वाहनचालक १५ हजार रुपये मिळतात. त्यातून वाहनचालकांना केवळ ७५०० रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून, नवीन कंत्राटी पद्धतीनेच पण जिल्हा परिषदेमार्फत वाहनचालकांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी या वाहनचालकांनी केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य