शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे  जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:13 IST

भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट टू होम’ प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत उपलब्ध करून देण्याच्या राज्यातील पहिल्या उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देभारतीय लोक प्रशासन संस्थेचा इनोव्हेशन अवॉर्ड जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट टू होम’ प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत उपलब्ध करून देण्याच्या राज्यातील पहिल्या उपक्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.शासन आपल्या दारी या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जनतेला प्रशासनातर्फे दिले जाणारे प्रमाणपत्र नेमून दिलेल्या वेळेपेक्षा कमी दिवसांच्या आत घरपोच पोस्टसेवेद्वारे उपलब्ध करून देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन यावर्षीचा पुरस्कार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेतर्फे जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे १६ मार्च रोजी विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.‘डायरेक्ट टू होम’ या उपक्रमांतर्गत १६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ८२ हजार ४९ प्रमाणपत्रांचे घरपोच वितरण पूर्ण झाले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरावरही दखल घेण्यात आली असून, भारतीय लोक प्रशासन संस्थेद्वारे दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्यस्तरावर दिल्या जाणाºया स्वर्गीय डॉ. एस. एस. गडकरी मेमोरियल अवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लिक अ‍ॅडमिनीस्ट्रेशन २०१७ या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची निवड केली आहे.‘डायरेक्ट टू होम’या उपक्रमासाठी गौरव नागपूर शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू विभागामध्ये यावे लागते. त्यामुळे सेतू कार्यालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नागरिकांना सहज, सुलभ व पारदर्शकरीत्या कमी वेळात जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व अधिवास राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतानादेखील गर्दीमुळे गैरसोयींचा सामना करावा लागत होता. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जनतेला घरपोच प्रमाणपत्र वाटपासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्पीड पोस्ट सेवेद्वारा जनतेला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले आहेत. १ फेब्रुवारी २०१७ पासून ८२ हजार ४९ प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत तसेच शासनाबाबतही विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर