शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात कपाशी पुन्हा संकटात : बोंडअळीनंतर आता कवडी रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:56 IST

पावसाचा लहरीपणा, दमट आणि पिकाला हानीकारक अशा वातावरणामुळे भिवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली. परंतु त्याचाही काहीएक फायदा होऊ शकला नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यातच आता तीन वेचणीनंतर कपाशीची अखेरची वेचणी सुरू असताना कपाशी संकटात सापडली आहे. कपाशीवर लाल किटकांनी आक्रमण केले आहे

ठळक मुद्देकापूस उत्पादकांवर संकटाची मालिका

राम वाघमारेआॅनलाईन लोकमतनागपूर : पावसाचा लहरीपणा, दमट आणि पिकाला हानीकारक अशा वातावरणामुळे भिवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणी केली. परंतु त्याचाही काहीएक फायदा होऊ शकला नाही. यामुळे कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट आली. त्यातच आता तीन वेचणीनंतर कपाशीची अखेरची वेचणी सुरू असताना कपाशी संकटात सापडली आहे. कपाशीवर लाल किटकांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशीची वेचणी करण्यास मजूरही मागेपुढे पहात आहे. लाल किटकाद्वारे कपाशीवर ‘कवडी रोग’ उद्भवतो. त्यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक हवालदिल झाला आहे.तालुक्यातील कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकाची फवारणीही केली. मात्र त्याचा फायदा होऊ शकला नाही. बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यातच आता कापसाला योग्य भाव नसल्याने कापूस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडला आहे. कापसाची वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. सर्वच शेतात पांढरे सोने दिसून येते. मात्र त्यावर आता कवडी रोगाचे आक्रमण झाले आहे. परिणामी कापसाच्या वेचणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे.बोंडअळीच्या हल्ल्यातून वाचलेल्या कपाशीच्या बोंडावर आता लाल पाखरांचे आच्छादन असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कपाशीच्या प्रत्येक बोंडावर १० ते १५ पेक्षा अधिक संख्येने तसेच झाडावर आणि जमिनीवरही लाल पाखरांचे आच्छादन दिसून येते. नांद, पांजरेपार, भगवानपूर, चिखलापार, बेसूर आदी गावात ही स्थिती निदर्शनास येते. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन पाहणी करावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.शेतातील बुरशी कारणीभूतयाबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता या रोगाला कवडी रोग (एन्थेकनोज) असे संबोधत असल्याचे सांगण्यात आले. शेतातील बुरशी यासाठी कारणीभूत ठरते. हा रोग कोलेटोट्रिकम इंडीकम या कवचामुळे होतो. महाराष्ट्रात कापूस पिकविणाऱ्या सर्वच ठिकाणी हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो.रोगाचे लक्षणकपाशीवर हा रोग दोन अवस्थेत दिसून येतो. पहिल्या अवस्थेत रोपे मरतात. रोपांवर सुरुवातीला बिजलावर गोलाकार तांबूस ठिपके येतात. तसेच कोवळ्या देठावर जमिनीलगतच्या भागावर व्रण अथवा चट्टेरी खूण येऊन रोपे मरतात. रोपास येणाऱ्या दुसऱ्या पानावर व फांदीवर हा रोग आढळत नाही. हाच रोग दुसऱ्या अवस्थेत बोंडावर आढळतो. संपूर्ण बोंड या रोगाने व्यापले जाऊन आतील कापूस या बुरशीमुळे घट्ट चिकटून राहतो. तीच बुरशी खायला हे लाल रंगाचे कीटक येतात. यालाच कवडी रोग म्हणतात.रोगावर उपाययोजनाया कवडी रोगाचे लक्षण दिसताच २५ ग्रॅम कॉपर आॅक्झिक्लोराईड किंवा २० ग्रॅम कार्बोन्डाझिम किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब व स्ट्रेप्ट्रोसायक्लीन २ ग्रॅम हे १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. त्यामुळे हा रोग आटोक्यात येतो.नुकसानीचे स्वरूपया रोगामुळे कपाशीची रोगग्रस्त पाने कालांतराने सुकतात व शेवटी गळून पडतात. दमट व पावसाळी हवामानात या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगाची बुरशी पालापाचोळ्यावर असते. तसेच बुरशी पुढील हंगामातील पिकास रोग होण्यास कारणीभूत ठरते. कपाशी पिकावर हा रोग अतिवृष्टीच्या, थंड हवामानाच्या आणि विशेषत: ओलिताच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणत आढळतो. या रोगास दमट व किंचित उष्ण वातावरणही पोषक ठरते. रोगामुळे बोंडातील कापूस चिकटून राहत असल्याने उत्पादनावर व कपाशीच्या प्रतिवर विपरीत परिणाम होतो.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी