शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: सीईओंची मंजुरी न घेता थेट मंत्रालयातून बदली आदेश, स्थायी समितीने ठेवले नियमावर बोट

By गणेश हुड | Updated: June 27, 2024 19:27 IST

Nagpur News: नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण  विभागात हयात नसलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून नियुक्ती आदेशाचे प्रकरण गाजत असतानाच या विभागातून वर्षभरापूर्वी बदली झालेल्या एका तृतीयश्रेणी कर्मचाऱ्याने पुन्हा याच विभागात आपली बदली करण्यासाठी थेट मंत्रालयातून आदेश आणला.

- गणेश हूडनागपूर - जिल्हा परिषदेच्या शिक्षण  विभागात हयात नसलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून नियुक्ती आदेशाचे प्रकरण गाजत असतानाच या विभागातून वर्षभरापूर्वी बदली झालेल्या एका तृतीयश्रेणी कर्मचाऱ्याने पुन्हा याच विभागात आपली बदली करण्यासाठी थेट मंत्रालयातून आदेश आणला. परंतु जि.प. सेवा अधिनियमाचे हे उल्लघन असल्याने मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा आदेश मान्य न करता शासनाकडे पुनर्विचारासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय शासनाशी असा पत्रव्यवहार करता येत नाही. सीईओ मार्फत असा पत्रव्यवहार करणे बंधनकारक आहे. असे असतानाही वर्षभरापूर्वी शिक्षण विभागातून हिंगणा पंचायत समितीत बदली झालेले कर्मचारी राहुल देशमुख यांनी थेट मंत्रालयातून आदेश आणला. यासाठी त्यांनी शिक्षण विभागात कार्यरत राजेंद्र राचेलवार यांना आपसी बदलीसाठी राजी केले.  स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सेवा नियमाचे उल्लघन केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा बदली आदेश लागू न करता तो शासनाकडे पुर्विचारासाठी पाठवून संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचे निर्देश देण्यात आले.

तीन वेळा थेट मंत्रालयातून आदेश एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाल्यानंतर दहा वर्षे पुन्हा त्याच विभागात नियुक्ती मिळत नाही. परंतु यापूर्वीही तीन वेळा मंत्रालयातून आदेश काढून बदली रद्द करण्यात आल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर शासन आदेश लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षण विभागात पुन्हा परत येण्याचे स्वप्न तूर्त भंगले आहे.

टॅग्स :Transferबदलीnagpurनागपूर