शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
4
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
5
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
6
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
9
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
10
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
11
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
12
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
13
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
14
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
15
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
16
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
17
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
18
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
19
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
20
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

Nagpur: थकबाकीदार वीज ग्राहकांना डिजिटल नोटीस, ३१ मार्चपर्यंत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडणार

By आनंद डेकाटे | Published: March 23, 2024 8:05 PM

Nagpur News: वीज बिलाच्या ७१.४२ कोटी रूपयाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची मोहीम वेगाने सुरू आहे. वारंवार विनंती करूनही बिल न भरणाऱ्या बहुतांश ग्राहकांची वीज ३१ मार्चपर्यंत बिल न भरल्यास खंडित करण्यात येणार आहे.

- आनंद डेकाटे नागपूर - वीज बिलाच्या ७१.४२ कोटी रूपयाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची मोहीम वेगाने सुरू आहे. वारंवार विनंती करूनही बिल न भरणाऱ्या बहुतांश ग्राहकांची वीज ३१ मार्चपर्यंत बिल न भरल्यास खंडित करण्यात येणार आहे. दरम्यान, महावितरणने डिजीटल प्रणालीद्वारेही नोटीस पाठवून कनेक्शन तोडता येईल, असे स्पष्ट केले आहे. महावितरणचे म्हणणे आहे, कंपनी वीज कायद्याच्या कलम ५६ अंतर्गत व्हॉट्सॲप, एसएमएस, ई-मेलवर नोटीस पाठवून पुरवठा खंडित करू शकते. कारवाई टाळण्यासाठी वीज नियमित भरण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. यासोबतच ग्राहकांच्या सोयीसाठी नागपूर परिमंडळात सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीज बिल संकलन केंद्र सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. २४, २९, ३०, ३१ मार्च रोजी शनिवार आणि रविवार सार्वजनिक सुट्ट्या आहेत. आता हे सर्व दिवस वीज बिल भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. याशिवाय महावितरणची वेबसाइट, मोबाइल ॲप, पेमेंट वॉलेट आदींद्वारेही ऑनलाइन पेमेंट करता येते.

त्वरित बिल भरल्यास एक टक्के सवलतवेळेपूर्वी वीजबिलाचा भरणा केल्यास महावितरण ग्राहकांना त्वरित पेमेंटमध्ये सवलत देते. याअंतर्गत ग्राहकांना एक टक्का सवलत दिली जाते. ऑनलाइन बिल पेमेंटवर ०.२५ टक्के दिलासा दिला जातो. तुम्ही कागदी बिलांऐवजी ऑनलाइन बिल घेण्याचा गो ग्रीन पर्याय निवडल्यास, प्रत्येक बिलावर १० रुपये सवलतही दिली जात आहे.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर