शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लॉजिस्टिक पार्कचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:32 IST

भौगोलिक स्थितीनुसार नागपुरात मोठा लॉजिस्टिक पार्क बनविण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खापरीमध्ये हा पार्क बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सात महिन्यानंतरही लॉजिस्टिक पार्कसाठी जागा निश्चित होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे जागा निश्चित नाही : सल्लागारांची नियुक्ती व सर्वे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भौगोलिक स्थितीनुसार नागपुरात मोठा लॉजिस्टिक पार्क बनविण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खापरीमध्ये हा पार्क बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सात महिन्यानंतरही लॉजिस्टिक पार्कसाठी जागा निश्चित होऊ शकली नाही.‘एनएएचआय’कडे जबाबदारीनितीन गडकरी यांच्या घोषणेनुसार खापरीजवळ जवळपास ३०० एकरमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) बनविण्यात येणार आहे. मध्य भारतातील सर्वात मोठ्या पार्कच्या विकासाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएएचआय) देण्यात आली आहे. याकरिता सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी नियुक्त कंपनी वायलेंट सोल्युशन वाहतुकीचा अभ्यास करीत आहे. अहवालानंतरच यावर पुढे पाऊल टाकण्यात येणार आहे.हा पार्क जवळपास ३०० एकरमध्ये बनविण्याची योजना आहे. सध्या मिहानजवळील जागा शोधण्यात येत आहे. कॉन्कोरच्या आयसीडीलगतच पार्क बनविण्याचा प्रयत्न आहे. कारण कॉन्कोरचा आयसीडी ४५ एकरमध्ये असून माल वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहे. त्यालगत नवीन पार्कच्या विकासामुळे जास्त अडथळे येणार नाही. त्यानंतरही जमीन निश्चित करण्यात आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार खापरी आणि कॉन्कोरलगत बांधकाम केल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणीचा लाभ मिळेल. पार्कसाठी तिन्ही माध्यमे उपयुक्त ठरणार आहे.रेल्वेच्या लाईनचा विस्तारखापरी येथे सर्व सुविधा आहे. ही जागा निश्चित झाल्यास रेल्वेला एक अतिरिक्त रेल्वेलाईन टाकावी लागेल. याशिवाय रेल्वेलाईनसाठी कॉन्कोरने रेल्वेकडे रक्कम जमा केली आहे. या लाईनच्या विस्तारामुळे दोन्ही प्रकल्पाला फायदा मिळेल आणि नागपूर खऱ्या अर्थात लॉजिस्टिक पार्क बनू शकेल.वाहतुकीचा अभ्यासप्राप्त माहितीनुसार, सध्या वाहतूक सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. सध्या आणि भविष्यातील वाहतुकीच्या स्थितीवर दिल्लीची कंपनी माहिती गोळा करीत आहे. गरज कुठल्या वस्तूंची आहे आणि माल कुठे जातो, याचीही चाचपणी घेण्यात येत आहे. सर्व्हेक्षणानंतर लॉजिस्टिक पार्कमध्ये सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. जीएसटीनंतर नागपूरच्या विकासाच्या शक्यता अधिक प्रबळ झाल्या आहेत. खापरी येथे मोठ्या कंपन्या वेअरहाऊस तयार करीत आहेत. अनेक मोठे ब्रॅण्ड आल्या असून काही कंपन्या विकासाच्या संधी शोधत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर