शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रेमप्रकरणातून स्वत:ला जाळून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:34 IST

लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची कळमना ठाण्यात नोंदविण्यात आलेली तक्रार बनावट निघाली. प्रेयसीसोबत वाद झाल्यामुळे पीडित तरुणाने स्वत:च स्वत:ला पेटवून घेतले आणि नंतर स्वत:ची आणि प्रेयसीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. कळमना पोलिसांनी आज हा दावा केला आहे.

ठळक मुद्देरॉकेल टाकून पेटविल्याच्या प्रकरणाला कलाटणीतक्रार दिशाभूल करणारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची कळमना ठाण्यात नोंदविण्यात आलेली तक्रार बनावट निघाली. प्रेयसीसोबत वाद झाल्यामुळे पीडित तरुणाने स्वत:च स्वत:ला पेटवून घेतले आणि नंतर स्वत:ची आणि प्रेयसीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. कळमना पोलिसांनी आज हा दावा केला आहे.कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून शनिवारी मध्यरात्री जात असताना एका आरोपीने रोखले. ‘तुम्हारे पास कितने पैसे है, असे त्याने विचारले. मेरे पास पैसे नही’, असे म्हटले असता आरोपीने आपल्या खिशात जबरदस्तीने हात घातला. तो रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आपण त्याचा प्रतिकार केला. यामुळे आमची हाणामारी झाली. ते पाहून आरोपींचे दोन साथीदार अंधारातून आले. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून माचिसची जळती काडी फेकली. त्यामुळे गंभीररीत्या भाजलो, असे तक्रारवजा बयान इस्माईल अब्दुल मन्नान कुरेशी (वय २४) याने रविवारी कळमना पोलिसांना दिले होते. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू केली. इस्माईल यशोधरानगरातील एनआयटी क्वॉर्टरजवळ राहतो. सध्या ७० टक्के भाजल्यामुळे तो मेयोत मृत्यूशी झुंज देत आहे. त्याने सांगितलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी अनेकांसह इस्माईलशी संबंधित व्यक्तींनाही विचारपूस केली, तेव्हा भलतीच माहिती पुढे आली.कळमना पोलिसांच्या माहितीनुसार, इस्माईल चिकन विक्रेता असून, त्याचे शांतिनगरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहे. त्यांचा शनिवारी वाद झाला. त्यातून इस्माईलने स्वत:ला पेटवून घेतले. ते पाहून त्याची प्रेयसी त्याला वाचविण्यासाठी धावली. त्यात तिचेही हात भाजले. तिनेच सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

टॅग्स :fireआगSuicideआत्महत्या