शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

नागपुरात ‘दयासागर’ ने केले उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 18:53 IST

रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील वृक्षांना पाणी देऊन जगविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.दयासागर वेलफेअर असोसिएशन ही एक समाजिक संस्था आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम संस्थेकडून राबविण्यात येते. महापालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यात आली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांकडे कुणीही लक्ष देत नाही. पाणी न मिळाल्यामुळे अनेक वृक्ष मरूनही जातात. दयासागर वेलफेअर असोसिएशन गेल्या ७ वर्षापासून दक्षिण नागपुरात रस्त्यावर लागलेल्या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहे. असोसिएशनचे सदस्य सकाळी ७ वाजता आॅटोमध्ये पाणी भरून रस्त्यावरील वृक्षांना देतात. उन्हाळाभर नियमित त्यांचे हे कार्य सुरू होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक वृक्ष जगले. दयासागरच्या या कार्यात अजय पांडे, अवनिकांत वर्मा, सॅम्युअल मसीह, सिराज शेख, मनोज गावंडे, यांचेही सहकार्य लाभले. संस्था पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. मित्र, नातेवाईकांच्या जन्मदिनाला, आप्तेष्टांच्या स्मृतिदिनाला एक वृक्ष लावण्याचे आवाहन करते. असोसिएशनतर्फे शहरातील वंजारीनगर टी. बी. वार्ड, अजनी, इंदिरा कॉलनी, बनर्जी ले-आउट, भगवाननगर, रामेश्वरी, हावरापेठ, चंद्रनगर, महात्मा फुले उद्यान सुयोगनगर, नरेंद्रनगर, पार्वतीनगर यासह हिंगणा परिसरात वृक्ष लागवडीपासून वृक्षाचे संवधन केले आहे. २५ वर्षापूर्वी धंतोलीतून येत असताना कचºयाच्या ढिगाºयात आंब्याचे छोटेसे झाड उमलले होते. तेथून ते झाड उचलून मी चंद्रमणीनगरातील डगलस होस्टेल अनाथाश्रमात लावले. आज त्या वृक्षांची फळे परिसरातील लोक खात आहे. तेव्हापासूनच वृक्षांप्रती प्रेम निर्माण झाले. ते आजही सुरूच आहे. याच भावनेतून आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या काठावरील वृक्षांना पाणी देतो, वृक्षाच्या सभोवतालचा परिसर साफ करून, वृक्षाच्या बुंध्याला आळा करतो. वृक्ष जगावे हाच त्या मागचा प्रयत्न असतो.मनीष चांदेकर, पदाधिकारी, दयासागर वेलफेअर असोसिएशन 

टॅग्स :environmentपर्यावरणnagpurनागपूर