शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला, तुफान दगडफेक, वाहनही फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:30 IST

Criminals attacked on police, crime news गावठी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी जोरदार हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास रामटेकेनगर टोली भागात ही घटना घडली.

ठळक मुद्देरामटेकेनगर टोली भागात तणाव : पोलीस आयुक्तही घटनास्थळी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गावठी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी जोरदार हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून  त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास रामटेकेनगर टोली भागात ही घटना घडली. त्यानंतर दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी धावला. परिस्थिती लक्षात घेऊन अनेक वरिष्ठांसह पोलीस आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. वृत्त लिहिस्तोवर टोली भागात प्रचंड तणावाची स्थिती होती.

रहाटे टोली, रामटेके नगर भागात असलेल्या एका झोपडपट्टीत जागोजागी हातभट्टीची दारू गाळली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डेही चालतात. पोलीस त्या ठिकाणी वारंवार कारवाई करतात; मात्र त्याला न जुमानता हे गुन्हेगार पुन्हा काही दिवसांनी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्डे सुरू करतात. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पोलिसांचे पथक तिकडे कारवाईसाठी गेले. पोलीस कारवाई करीत असल्याचे बघून गुन्हेगारांनी महिला-मुलांना पुढे केले. त्यांच्या आडून त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड केली. मोठ्या संख्येत गुन्हेगारांनी धाव घेतल्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देऊन घटनास्थळी पोलीस ताफा मागवून घेतला. वरिष्ठांनाही कळविले. पोलिसांवर हल्ला झाल्याचे आणि घटनास्थळी प्रचंड तणाव असल्याचे कळल्यामुळे अजणीचे ठाणेदार विनोद चौधरी, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे तेथे पोहोचले. बिथरलेला जमाव दगडफेक करून पोलिसांच्या कारवाईला विरोध करत असल्याने आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस, बीट मार्शल, शीघ्र कृतीदल, दंगा नियंत्रण पथक बोलावून घेण्यात आले. त्यानंतर वरिष्ठांसह मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तिकडे धावला. स्वतः पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही घटनास्थळ गाठले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू केली. घरातील माणसं पोलीस पकडून नेत असल्याने घरातील महिला मुलांनी अक्षरशः लोटांगण घेऊन आक्रोश सुरु केला. आजूबाजूचे नागरिकही घटनास्थळी पोहोचले.

रात्री १०.१५ पर्यंत या भागात प्रचंड तणावाची स्थिती होती.

अनेक जण ताब्यात

रात्री १० वाजेपर्यंत १५ ते २० जणांना पोलीस ठाण्यात आणून बसविण्यात आले होते. त्यांच्याकडून हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात होता.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी