शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  विद्यार्थ्यांना पाजले शौचालयाचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 20:34 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे २३ व २४ फेब्रुवारीला काटोल कन्या शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यावे लागले. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाचे बिंग फुटले आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रशासनाचा गलथानपणा : आयोजनातही भोंगळपणा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे २३ व २४ फेब्रुवारीला काटोल कन्या शाळेच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यावे लागले. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाचे बिंग फुटले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणाला वाव देण्यासाठी दरवर्षी जि.प. च्या शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. क्रीडा स्पर्धेबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. दोन दिवसीय या महोत्सवात विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाचीही सोय प्रशासनातर्फे करण्यात येते. २३ व २४ फेब्रुवारीला या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेमध्ये वॉटर कॅन आणण्यात आल्या होत्या. परंतु त्यातील पाणी संपल्याने आयोजकांनी शौचालयातील बेसिनच्या नळाला पाईप लावून पाण्याच्या कॅनमध्ये टाकला होता. हे पाणी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक पित होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे स्पष्ट दिसून येते.एकंदरीतच हे आयोजन पूर्णत: भोंगळ ठरले. अनेक अनियमितता आढळल्या. पहिल्याच दिवशी क्रीडा सामने उशिरा सुरू झाले. कबड्डी सामन्यात गोंधळ झाला. सांस्कृतिक कार्यक्रम उशिरा सुरू झाला. रात्री ११ वाजता सांघिक नृत्य स्पर्धा सुरू असताना पोलिसांनी डीजे व साऊंड सिस्टीम उचलून नेली. दुपारचे शिळे जेवण विद्यार्थ्यांना रात्री देण्यात आले. निवासाची व्यवस्था योग्य नव्हती. विद्यार्थ्यांना धूळ असलेल्या रुममध्ये झोपविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी सामनास्थळी उपस्थित नसल्याने एक विद्यार्थी बेशुद्ध होऊन पडला. ही सर्व गैरसोय महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या सदस्यांनी मोबाईलबद्ध केली. विशेष म्हणजे या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष निधीची तरतूद असते. ग्रामीण भागातून विद्यार्थी स्पर्धेसाठी येतात. अशी गैरसोय होत असेल, यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असेल, तर जबाबदार कोण, असा सवाल संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केला आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळशासकीय अनुदानातून या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी थोटे यांच्याकडे होती. येथे घडलेला सर्व प्रकार अतिशय भोंगळ होता. यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या. परंतु त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नाही. शासकीय निधीतून असले आयोजन म्हणजे एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी प्रशासनाने केलेला खेळ आहे. अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.दिलीप लंगडे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना

टॅग्स :Studentविद्यार्थीSportsक्रीडा