शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 23:09 IST

Aditya Thackeray: नागपूर शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक असल्याचे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. कोराडी थर्मल पॉवरमध्ये आयएमए प्रकल्पाला पुन्हा सुरू करने, विकासाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कटाई करण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नुकताच नागपूरचा दाैरा केला.

- मेहा शर्मा नागपूर - शहराचे काँक्रिटीकरण प्रचंड धोकादायक असल्याचे मत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. कोराडी थर्मल पॉवरमध्ये आयएमए प्रकल्पाला पुन्हा सुरू करने, विकासाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कटाई करण्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी नुकताच नागपूरचा दाैरा केला. त्यांनी पर्यावरणवादी आणि नागरिकांचे मत ऐकले आणि 'लोकमत'शी विशेष चर्चा करताना आपली प्रतिक्रिया नोंदवली.

ते म्हणाले, पर्यावरणाच्या रक्षणासाठी संघर्ष करने कुण्या एका व्यक्तीचे काम नाही. हा राजकीय मुद्दासुद्धा नाही. हे मुद्दे विधानसभेत लावून धरले जाईल. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, नागपूरवासी चिरस्थायी विकासासंंबंधात आपल्या भूमिकेवर अडिग आहेत, हे बघून आनंद होतो आहे. मात्र, शहराचे वेगाने होणारे काँक्रिटीकरण धोकादायक आहे. जोशीमठ याचे ताजे उदाहरण आहे. नागपूरात पर्यावरणवाद्यांनी कोराडी प्रकल्पाचा विस्तार, राखेची समस्या आणि आयएमएस प्रकल्पाशी संबंधित मुद्दे उचलून धरले आहेत. आपण मंत्री असताना या मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन चुकीचे काम होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, संवादावर विश्वास नसलेल्या सरकारसोबत आज संघर्ष होताना दिसतो आहे. हा व्यक्तीगत अहंकाराचा भाग नाही तर शहराच्या वर्तमान आणि भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले की, राज्य सरकार सामान्य जनतेच्या नव्हे तर बिल्डर्स आणि कंत्राटदाराच्या हिताचे धोरण राबवित आहे. सत्तेचा लोभ अन् भ्रष्टाचाराच्या जोरावर बनलेले राज्य सरकार जनहित आणि पर्यावरणाच्या हिताचे पावलं उचलत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. आमच्या सरकारने पर्यावरण आंदोलनाला सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांचे मुद्दे गांभिर्याने ऐकले. आज असे होत नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेnagpurनागपूर