शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा; अन्यथा कंपनीला ‘टर्मिनेट’ करू", नितीन गडकरी यांनी दिला इशारा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: December 23, 2024 15:46 IST

Nagpur News: धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

नागपूर -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंग कामाला उशीर होत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या कामाला उशीर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नितीन गडकरी यांनी सोमवारी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आ. मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे, आणि के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळी १० ते ६ वेळेत विमानाची ये-जा बंद; तिकिटांचे दर तिपटीने वाढले

गडकरी म्हणाले, डिसेंबर २०२३ मध्ये विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीच्या रिकार्पेटिंगची निविदा प्रसिद्ध केली. १ मे २०२४ रोजी के. जी. गुप्ता कंपनीला कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या. शिवाय, धावपट्टीच्या कामामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नागपूर विमातळावरील आवागमन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढले. याचा नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना त्रास होत आहे.

कंपनी म्हणते १ मेपर्यंत काम पूर्ण करूकार्यादेश मिळाल्यावर कंपनीने जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होते. त्यानंतर २४ नोव्हेंबरपासून काम पुन्हा सुरू झाले. पहिल्या लेअरचे काम ८० टक्के, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचे काम २१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

पाच महिने सोसावे लागेल तिकिटांची दरवाढगडकरी म्हणाले, नागरिकांना आणखी पाच महिने विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागेल. हे योग्य नाही. कंपनीने एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. 

हॉटमिक्स प्रकल्प ८ किमी दूर, आठ रोलरने काम करागडकरी म्हणाले, कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प कामाच्या ठिकाणापासून ८ किमी दूर लावला आहे. त्या ठिकाणाहून प्रकल्पस्थळी मटेरियल आणण्यासाठी बराच वेळ लागतो. परिणामी कामाला उशीर होतो. कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प जवळच उभारावा. कंपनी तीन रोलरने काम करीत आहे. कंपनीने प्रारंभीपासूनच सात ते आठ रोलरने काम केले असते तर बरेच काम झाले असते. कंपनीच्या इंदुर येथील कंत्राटदारांशी बोलणे झाले असून तातडीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर