शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नागपुरात ताप, सर्दी, खोकल्याने वाढविली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:05 AM

वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देघराघरात रुग्ण : खासगीसह शासकीय रुग्णालयात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.उपराजधानीत गेल्या आठवड्यात थंडीत वाढ झाली होती तर गेल्या दोन दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. दिवसा कडक उन्ह आणि सकाळी व सायंकाळी थंड वाऱ्यांमुळे विषाणूजन्य आजारात वाढ होत आहे. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडले आहेत. यामुळे औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगाच्या रांगा दिसत आहेत. यातच डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे.श्वासांद्वारे एकाकडून दुसऱ्याकडे जंतू संक्रमिततज्ज्ञांच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रीम, कोल्डड्रिंक प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. श्वासांद्वारे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे जंतू संक्रमित होत असल्याने एकाच घरात व्हायरल फिव्हरचे एकापेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.डॉक्टरांचा सल्ला घ्यावातावरणातील बदलाचा परिणाम विशेषत: लहान मुलांवर अधिक दिसतो. प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना लवकर विषाणूजन्य आजार होतात. वृद्धांनाही ताप, खोकला, अंगदुखी आदी व्याधी जाणवू लागल्या आहेत. यामुळे सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या शिवाय गर्दीचे ठिकाण टाळा. पुरेशी झोप घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा. परीक्षेचे वातावरण असले तरी तणावाला दूर ठेवा.-डॉ. अविनाश गावंडेसहयोगी प्राध्यापक, मेडिकल

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर