शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर युवक काँग्रेसची मतमोजणी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:29 IST

नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळाचा गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीवरही परिणाम झाला. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐनवेळी मतमोजणी शुक्रवारपर्यंत स्थगित ठेवली. दरम्यान मतमोजणी स्थगित झाल्याबाबत माहिती नसल्याने देवडिया काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सायंकाळपर्यंत मतमोजणी सुरू होण्याची प्रतीक्षेत थांबले होते.

ठळक मुद्देमतदानादरम्यान झालेल्या गोंधळाचा परिणाम : बाजू मांडण्याची संधी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळाचा गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीवरही परिणाम झाला. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐनवेळी मतमोजणी शुक्रवारपर्यंत स्थगित ठेवली. दरम्यान मतमोजणी स्थगित झाल्याबाबत माहिती नसल्याने देवडिया काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सायंकाळपर्यंत मतमोजणी सुरू होण्याची प्रतीक्षेत थांबले होते.९ सप्टेंबरला युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान सुरू झाले. निवडणूक प्रक्रियेतून प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहराध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. मतदानाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी पश्चिम व दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी मतदान झाले. नागपूर शहरात एकूण १२,५०० मतदारांपैकी ५,०२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शहराध्यक्ष पदाचे उमेदवारांनी एहबाब कम्युनिटी हॉल येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप करून गोंधळ घातला. कार्यक र्त्यांनी गोंधळ घालून धक्का-बुक्की केली.गुरुवारी सकाळी १० वाजता देवडिया काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष, महामंत्री व विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणीला सुरुवात होणार होती. परंतु सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. मतमोजणी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मतमोजणीबाबत परिस्थिती स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी दिसून आली.बोगस मतदानाचा आरोपमतदान अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहराध्यक्ष पदाचे उमेदवार धीरज पांडे व इर्शाद शेख यांची बाजू जाणून घेतली. दोघांनीही बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. पांडे म्हणाले, युवक काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय आहे. काँग्रेस विचाराशी प्रामाणिक आहे. मी कुणालाही मारहाण के ली नाही. फक्त बोगस मतदान झाल्याचा आरोप करीत होते. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी धक्का दिल्याने त्यांचे संतुलन बिघडले व ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंगावर पडले. त्यांनी बोगस मतदानाची चौकशी करण्याची मागणी केली.कारवाईचे संकेतयुवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे अभिप्राय मागितला आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक