शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंच्या नजरेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:02 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात ३८०० पैकी ३५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची चाचणी घेतली जात आहे. कार्यान्वित करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांंचा डाटा संकलित केला जात आहे. काही दिवसातच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून शहर सीसीटीव्हीच्या देखरेखीत येणार आहे.

ठळक मुद्देप्रकल्प अंतिम टप्प्यात : ३८०० पैकी ३५०० कॅमेरे कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात ३८०० पैकी ३५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची चाचणी घेतली जात आहे. कार्यान्वित करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांंचा डाटा संकलित केला जात आहे. काही दिवसातच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून शहर सीसीटीव्हीच्या देखरेखीत येणार आहे.शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, महापालिका व पोलीस विभाग संयुक्तपणे हा प्रकल्प राबवित आहे. ५२० कोटींचा हा प्रकल्प असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. एल अ‍ॅन्ड टी कन्स्ट्रक्शन यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. १८ आॅक्टोबर २०१६ पर्यंत पूर्ण करावयाचा होता. मात्र निर्धारित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. यात अनेक अडचणी आल्या. मेट्रो रेल्वेसह शहरात सुरू असलेल्या विकास कामांचाही यात अडथळा आला.या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्ते, चौक सीसीटीव्हीच्या देखरेखीत आले आहे. याचा शहर पोलिसांना उपयोग होणार आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे. चौकात सिग्नल तोडणाºयांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्याला मदत होत आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्याला मदत होणार आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सर्व्हरशी जोडण्यात आले असून डाटा संकलित केला जात आहे. महापालिका मुख्यालयातील कक्षासोबत जोडण्यात आले आहे. तसेच पोलीस मुख्यालयात कंट्रोल रुम उभारण्याचे काम सुरू आहे.प्रकल्पाचे लवकरच उद्घाटननागपूर शहरात ३८०० पैकी ३५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची चाचणी घेतली जात आहे. लवकरच या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे.डॉ. रामनाथ सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी एनएसएससीडीसीएल

टॅग्स :cctvसीसीटीव्हीnagpurनागपूर