शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर काँग्रेस कार्यकारिणीत होणार फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:04 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन करीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने कामाला लागण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या शहर काँग्रेस समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून शहर काँग्रेस समितीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे पुनर्मूल्यांकन करून कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देविधानसभेच्या पार्श्वभूमीवर तयारी : शहर काँग्रेसने घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन करीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने कामाला लागण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या शहर काँग्रेस समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून शहर काँग्रेस समितीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे पुनर्मूल्यांकन करून कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात गुरुवारी झाली. बैठकीला प्रदेश चिटणीस अतुल लोढे, अ‍ॅड अभिजीत वंजारी, शेख हुसैन, माजी आमदार यशवंत बाजीराव, माजी महापौर नरेश गांवडे आदी उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे म्हणाले, काँग्रेसची ताकत वाढली आहे. गेल्यावेळीपेक्षा १ लाख ४१ हजार मते जास्त मिळाली आहेत. संघटनेने लोकसभा उमेदवारांच्या पूर्णपणे पाठीशी राहून चांगले काम केलेले आहे. परंतु विधानसभेचा विचार करता बूथनिहाय बांधणी करणे गरजेचे आहे. यावेळी सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली मते, आघाडी- पिछाडीची कारणे आदींचा आढावा घेण्यात आला.विधानसभेसाठी निवडणूक समिती नेमणारविधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय निवडणूक समितीची स्थापना केली जाईल. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना बूथ प्रमुखाची जबाबदारी सोपविली जाईल. बूथचे ए,बी व सी असे वर्गीकरण केले जाईल. तसेच निष्क्रिय बूथ अध्यक्ष व ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बदलण्याची प्रक्रियादेखील करण्यात येईल, असे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. विधानसभानिहाय मेळावे, प्रभागनिहाय शिबिर, बूथनिहाय आखणी करण्याचे निश्चित करण्यात आले.झेपत नसेल तर पदमुक्त व्हा !काँग्रेस पक्षामध्ये ब्लॉक अध्यक्ष महत्त्वाचा घटक आहे. ज्या ब्लॉक अध्यक्षांना आपली जबाबदारी झेपत नसेल त्यांनी इतरांना संधी देत ब्लॉक अध्यक्षांची जबाबदारी सोपवावी. अनेक पदाधिकारी आपापल्या पदानुसार जबाबदारी घेत नाही. याचा फटका पक्षाला बसतो. नव्या जोमाने कामाला लागायचे असेल तर स्वागत आहे नाही तर पदमुक्त व्हा, अशा शब्दात ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. यावेळी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर