शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात काजू स्वस्त, बदाम, आक्रोड व खारीक महाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:14 IST

गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे जीएसटीचा परिणाम : मिठाईऐवजी सुका मेव्याला मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरला आहे. प्रत्येक समारंभ आणि भेटस्वरुपात देण्यासाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.इतवारा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन म्हणाले, भारत सरकारने खारीकवर २०० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे पाकिस्तानातून आवक बंद झाली आहे. याशिवाय देशांतर्गत उत्पादक कमी असल्यामुळे ठोक बाजारात भाव १२० रुपयांवरून २८० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत असून सध्या भाव कमी होण्याची काहीही शक्यता नाही. याशिवाय बदाम ६६० रुपयांवरून ७१० रुपयांपर्यंत (किलो) वाढ झाली आहे. बदाम कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून आयात होते. नवीन उत्पादन येण्यास उशीर असल्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता नाही. अक्रोडच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. चिली आणि कॅलिफोर्निया येथून आवक कमी आहे. गेल्यावर्षीच्या ४०० रुपयांच्या तुलनेत भाव ६५० रुपयांपर्यंत वाढले आहेत.सध्या औषध म्हणून काजूला मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. इतवारी बाजारात ३२० नंबर काजूचे भाव गेल्यावर्षी ७८० रुपयांच्या तुलनेत ६९० रुपये आणि २४० नंबर काजू गेल्यावर्षीच्या ९०० रुपयांच्या तुलनेत ८०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. बाजारात काजूची आवक कोकण, ओरिसा, दक्षिण अफ्रिका आणि बहरीन देशातून होते. यंदा आवक चांगली आहे. किसमीस गेल्यावर्षीच्या २७० रुपयांच्या तुलनेत भाव २२० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सध्या बदामवर १२ टक्के जीएसटी, खारीक १२ टक्के, काजू ५ टक्के, अक्रोड ५ टक्के, किसमिस ५ टक्के आणि विलायचीवर ५ टक्के जीएसटी आहे.विलायचीत १६०० रुपयांची घसरणठोक बाजारात दीड वर्षांपूर्वी एक हजार रुपये आणि सहा महिन्यांपूर्वी विलायचीचे भाव २ हजार रुपये किलो होते. त्यानंतर भाव निरंतर वाढत ५ हजार रुपयांवर पोहोचले. त्यामुळे विक्रीत प्रचंड घसरण झाली. पण १५ दिवसांपूर्वी भाव १६०० रुपयांनी अचानक कोसळून ३४०० रुपयांपर्यंत खाली आले. आवक केरळ आणि तामिळनाडू येथून होते. या ठिकाणी विलायची बोर्डातर्फे लिलाव करण्यात येतो. खाकसची किंमत ५०० रुपयांवरून एक हजारापर्यंत वाढल्याचे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर