शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  क्रेझी कॅसलची लीज रद्द ; महामेट्रोचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान मुलांची पसंती असलेल्या क्रेझी कॅसलची लीज रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या जागेवर मेट्रो रेल्वेचे स्टेशन प्रस्तावित आहे. नागपूर शहराची ओळख बनलेला वॉटर पार्क क्रेझी कॅसल आता इतिहासजमा होणार आहे.अंबाझरी उद्यानाच्या समोरील क्रेझी कॅसल महमेट्रोच्या प्रकल्पासाठी अधिग्रहीत क रण्याची प्रक्रिया ...

ठळक मुद्देनासुप्र विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय : लीजधारकाला मिळणार भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान मुलांची पसंती असलेल्या क्रेझी कॅसलची लीज रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या जागेवर मेट्रो रेल्वेचे स्टेशन प्रस्तावित आहे. नागपूर शहराची ओळख बनलेला वॉटर पार्क क्रेझी कॅसल आता इतिहासजमा होणार आहे.अंबाझरी उद्यानाच्या समोरील क्रेझी कॅसल महमेट्रोच्या प्रकल्पासाठी अधिग्रहीत क रण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला गरज असेल तितकीच जागा महामेट्रो अधिग्रहित करणार होती. परंतु नंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथील संपूर्ण ६.७ एकर जागा महामेट्रोला देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नासुप्रने लीज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.क्रेझी कॅसलचे संचालन करणाऱ्या हल्दीराम समूहालाही जागेचा ताबा सोडण्यास सांगितले होते. नासुप्रने ही जागा हल्दीराम यांना लीजवर दिली आहे. २०२१ पर्यत या जागेची लीज आहे. मेट्रो प्रकल्पासाठी ही जागा तात्काळ खाली करण्याची गरज आहे. त्यानुसार विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निर्धारित कालावधीपूर्वी लीज रद्द करण्यात आल्याने नासुप्रला मोबदला द्यावा लागणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त अनुप कु मार यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेली तीन सदस्यीय समिती निर्णय घेणार आहे. के्रझी कॅसलच्या संचालकांनी १६२ कोटींची नुकसान भरपाईची मागणी केल्याची माहिती आहे. समितीच्या निर्णयानंतर नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होण्याची शक्यता आहे.आता मेट्रोला काम करणे शक्यसुरुवातील मेट्रो रेल्वे प्रकल्प व क्रेझी कॅसल दोन्ही सुरू ठेवण्याचा विचार होता. परंतु यात यश आले नाही. त्यामुळे अखेर के्रझी कॅसलची संपूर्ण जागा मेट्रोला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता मेट्रोेला काम करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर