शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:30 AM

महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास्था यातून स्पष्ट झाली.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाची उदासीन भूमिका : सलग तिसऱ्या दिवशी प्रवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास्था यातून स्पष्ट झाली. अशाच प्रकारातून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेली ग्रीन बससेवा बंद झाली आहे.३२० शहर बसमधून दररोज १.५५ ते १.६० लाख प्रवासी प्रवास करतात. चौथा शनिवार व रविवारी सुटी असल्याने दोन दिवस फारशी अडचण झाली नाही. परंतु सोमवारी शाळा-महाविद्यालय, कार्यालय सुरू होते. अशा परिस्थितीत बस उपलब्ध नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. तीन रेड बस आॅपरेटरचे प्रत्येकी १५ कोटी महापालिकेकडे थकीत आहेत. डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी बससेवा बंद केली आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने सोमवारी दिवसभर अधिकारी व पदाधिकारी व्यस्त होते. वृत्त लिहिपर्यंत संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नव्हता.शहर बससेवा पूर्ववत व्हावी, यासाठी शनिवारपासून आॅपरेटर व प्रशासन यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महापालिकेचे अधिकारी ऐकायला तयार नसल्याचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले. डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने आॅपरेटरने बस बंद केली आहे. सोमवारी सकाळी यासंदर्भात अधिकाºयांशी चर्चा केली. तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता आॅपरेटरला प्रत्येकी एक कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आॅपरेटरकडून प्रत्येकी तीन कोटींची मागणी होत आहे. तिकिटांचे पैसे आॅपरेटरलाच दिले जातात. यावर लवकरच तोडगा काढला जाईल. सभागृहात एकाही सदस्याने बस बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी यावर नाराजी व्यक्त केली.कामगार सेनेचे निवेदनभारतीय कामगार सेनेचे जिल्हा संघटक बंडू तळवेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आॅपरेटरच्या संपाबाबत महापौर नंदा जिचकार यांना निवेदन देऊ न चर्चा केली. यावेळी त्यांनी आॅपरेटरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.बसभाड्यात २५ टक्के वाढआपली बस बंद असतानाच सोमवारी महापालिका सभागृहात आपली बसच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता २५ टक्के भाडेवाढ होणार आहे. आठ रुपये तिकिटासाठी १० रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय वेगवेगळ्या टप्प्यासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे. भाडेवाढीमुळे महापालिकेला दर महिन्याला एक कोटी अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे. सध्या बसभाड्यातून दर महिन्याला ५.२५ कोटींचे उत्पन्न होते. काही महिन्यापूर्वी एसटी बसभाड्यात १८ टक्के वाढ करण्यात आली होती. आपली बसच्या भाड्यात ८ सप्टेंबर २०१४ पासून वाढ करण्यात आलेली नव्हती. प्रस्तावात म्हटले आहे की, मार्च २०१७ मध्ये डिझेल प्रति लिटर ६२.५७ रुपये होेते. एप्रिल २०१८ मध्ये डिझेलचे दर ६९.१२ रुपयावर पोहचले. सध्या प्रति लिटर ७० रुपयाहून अधिक दर आहे. दुसरीकडे मिडी बसला प्रति किलोमीटर ४६.९० रुपये व स्टॅडर्ड बसला प्रति किलोमीटर ५२.१६ रुपये दिले जातात.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक