लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: उपराजधानीत काही दिवसांपूर्वी उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे सुगतनगर येथील ११ वर्षीय धर या जुळ्या भावंडाचा जीव गेला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आर्मर्स बिल्डर्स संचालक आनंद खोब्रागडे यांनी एक अर्ज दाखल करून १० लाख रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर करीत त्यांना ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.न्यायालयाने उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे जीव गमवावा लागलेल्या धर या जुळ्या भावंडाच्या कुटुंबीयाला १० लाख रु पयांची नुकसान भरपाई देण्याचे तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या मानधनाच्या खर्चासाठी १० लाख असे एकूण २० लाख रु पये जमा करण्याचे आदेश यापूर्वी बिल्डर आनंद खोब्रागडे यांना दिले होते. त्यानुसार खोब्रागडे यांनी धर कुटुंबीयाला १० लाख रु पयांची नुकसान भरपाई दिली होती. मात्र, चौकशी समितीच्या मानधनाच्या खर्चासाठी द्यावयाचे १० लाख रु पये हायकोर्ट प्रबंधकाकडे जमा केले नव्हते.याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बिल्डर खोब्रागडे यांनी न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला. पैशाची चणचण असल्यामुळे चौकशी समितीच्या मानधनाचा खर्च जमा करण्यासाठी विलंब होत असून ही रक्कम जमा करण्यासाठी महिन्याभराची मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे. न्यायालयाने बिल्डरचे म्हणणे ऐकून घेत त्यांना १० मेपर्यंत मुदतवाढ दिली. याप्रकरणी न्यायालय मित्र म्हणून अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.
नागपुरातील बिल्डरला १० लाख रु. जमा करण्यासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:39 IST
उपराजधानीत काही दिवसांपूर्वी उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे सुगतनगर येथील ११ वर्षीय धर या जुळ्या भावंडाचा जीव गेला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आर्मर्स बिल्डर्स संचालक आनंद खोब्रागडे यांनी एक अर्ज दाखल करून १० लाख रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मंजूर करीत त्यांना ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
नागपुरातील बिल्डरला १० लाख रु. जमा करण्यासाठी मुदतवाढ
ठळक मुद्देहायकोर्ट : हायटेन्शन लाईन मृत्यू प्रकरण