शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर भाजप कार्यकर्त्यांची रेल्वेगाडी चुकली; वेळेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:53 IST

मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली.

ठळक मुद्देमुख्य व अजनी रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दीभाजपाच्या प्रसिद्धीपत्रकात १० ची वेळ नमूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबई येथे भाजपच्या वर्धापन दिनासाठी नागपूरहून निघणाऱ्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत संभ्रम झाल्याने ही गाडी केवळ ३० कार्यकर्ते घेऊन नागपुरातून सकाळी रवाना झाली. वेळेबाबत रेल्वे प्रशासनात संभ्रम झाल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला. या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे.  प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही   ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते. 

आयआरसीटीसीने भाजपला ७.५० ची वेळ दिली होती. परंतु समन्वयाअभावी संभ्रम निर्माण झाला आणि कार्यकत्यांना १० ची वेळ समजली. रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार ही गाडी रवाना केली. अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून वर्ध्याहून जी स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार होती तीसुद्धा नागपूरहून पाठवण्यात येणार होती. ती गाडी आता वर्ध्याला न पाठवता नागपूरहून सोडण्यात आली.कुशकिशोर मिश्रावरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकमध्यरेल्वे नागपूर विभाग. 

टॅग्स :BJPभाजपा