शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

उपराजधानीत ‘सुपारी’चे नेटवर्क गुंतागुंतीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 10:57 IST

नागपूरसह मध्यभारतातील सडक्या सुपारीचे नेटवर्क तोडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

ठळक मुद्देचुप्पी साधणाऱ्यांची तक्रार धक्कादायक कारवाईचे संकेत

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह मध्यभारतातील सडक्या सुपारीचे नेटवर्क तोडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या समाजकंटकांकडून महिन्याला लाखोंची ‘सुपारी’ घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सडक्या सुपारीच्या नेटवर्कचा भाग बनलेल्यांवर धक्कादायक कारवाई होण्याचे संकेत संबंधित सूत्रांकडून मिळाले आहेत.जगात सर्वाधिक सुपारीचे उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशियाचे नाव आहे. प्रचंड उत्पादन असल्याने तेथे सुपारीचा दर्जा अत्यंत चांगला आणि किंमत कमी आहे. निकृष्ट दर्जाची सुपारी तेथे चक्क डम्पिंग यार्डमध्ये फेकली जाते. घाणीत फेकलेली आणि आरोग्यास घातक असलेली ही सुपारी मॅनमार्ग (बर्मा) मधून रंगून पोर्टमार्फत बाहेर काढली जाते. भारतात ही सुपारी इम्फाल मार्गे आणली जाते. मिझोरममध्ये हेलाकांडी, सिंलचर, करिमगंज, लालबाजारात एका पोत्याचे दोन पोते करून ही सुपारी मध्यभारतात आणली जाते. अत्यंत निकृष्ट (सडलेली) आणि आरोग्यास घातल असलेली ही सुपारी गंधकाच्या भट्टीत टाकून टणक आणि पांढरी केली जाते. नागपूर-मध्यभारतात खर्रा-गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. तंबाखू आणि चुन्याच्या मिश्रणात ही सडलेली सुपारी बारीक करून ती ग्राहकांना खºर्याच्या रूपात दिली जाते. सुगंधित सुपारी आणि मिठी सुपारी म्हणूनही ती विकली जाते. लहान मुलांपासून तो वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील सुपारी शौकिनांच्या घशात ही सडलेली सुपारी वेगवेगळ्या रूपात जाते. त्यामुळे मुखरोग आणि कर्करोगासारखे भयावह रोग ही सुपारी खाल्ल्यामुळे होतात. ही सुपारी नियमित खात असल्याने ‘लॉकजा’ सारखा रोगही होतो. त्यामुळे खर्रा खाणाऱ्यांचे तोंड पूर्णपणे उघडले जात नाही. परिणामी त्याला खाणे-पिणे (रोजचे जेवण) करण्यात आणि बोलण्यातही अडचण होते. एवढे गंभीर परिणाम या सडक्या सुपारीच्या सेवनाने होत असले तरी समाजकंटकांचा हा गोरखधंदा उपराजधानीत गेल्या दहा वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. नागपूर हे या गोरखधंद्याचे डेस्टिनेशन बनले आहे. सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून नागपुरातून रोज २०० ते ५०० पोती घातक सुपारी बाहेर पाठविली जाते. हीच सुपारी नागपुरातील शेकडो पानटपरींवरही पोहोचते. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. हा गोरखधंदा करणाऱ्या समाजकंटकांनी कारवाईचे अधिकार असलेल्या यंत्रणांमधील बहुतांश अधिकारी, कर्मचारी यांना आपल्या पापात सहभागी करून घेतले आहे. त्यांच्याकडे महिन्याला मोठी सुपारी (रोख रक्कम) पोहोचत असल्याने फूड, महसूल आणि पोलीस यंत्रणेतील मंडळींनी या गोरखधंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालविल्याचा आरोप होतो. या गोरखधंद्यात नवीन आलेल्या सुपारीबाजावर छापा मारून, १०० ते २०० पोती पकडल्याचा बोभाटा करून कारवाईचा बनाव केला जातो. गेल्या चार-पाच वर्षांत अनेक सुपारीवाल्यांवर कारवाई झाली, मात्र नंतर त्याचे काय झाले, हे उघड झालेले नाही.

ठिकठिकाणचे गोदाम भरलेलेतेलंगणात कोट्यवधींची रक्कम पकडली गेल्याने नागपुरातील मिरची-मसाला निर्यातदार प्रकाश वाधवानी यांचे निवास आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने कारवाई केली. या कारवाईने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली असली तरी फूड, महसूल आणि पोलीस यंत्रणेपैकी कुणी सुपारीच्या गोदामांवर धाडसी कारवाईची हिंमत दाखविलेली नाही. वाधवानी-छाबरानीच्या व्यावसायिक स्पर्धेतून पुढची कारवाई होऊ नये म्हणून ‘मनीष‘सह आणखी काही जण सरसावले आहेत. त्यांनी सुपारीवाल्यांमध्ये आपसी समेट घडवून आणण्याचे प्रयत्न चालविले आहे. अनेकांना आश्वस्त करण्यात आल्याने चिरागसह अनेक ठिकाणी कोट्यवधींची सडकी सुपारी अद्यापही पडून आहे. नागपूर शहराबाहेर (आॅक्ट्राय फ्री झोनमध्ये) अल्ताफची भोपाली अद्यापही सुरूच आहे. या संपूर्ण गैरप्रकारात चटवालचीही भूमिका महत्त्वाची आहे. गोरखधंद्यात गुंतलेल्या समाजकंटकांना विविध विभागातील काही अधिकारी-कर्मचारी साथ देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे नेटवर्क भक्कम आणि गुंतागुंतीचे असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत धक्कादायक कारवाई होण्याचे संकेत संबंधित सूत्रांकडून मिळाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी