शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

जीपीएस घड्याळीने नागपूर ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:08 IST

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. केंद्रातून आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला हा उपक्रम अतिशय आवडला होता. त्याच्या भरवशावरच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नागपूरला इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेसचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात मनपाला मिळाले यश‘इनोव्हेशन’मध्ये पहिला क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. केंद्रातून आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला हा उपक्रम अतिशय आवडला होता. त्याच्या भरवशावरच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नागपूरला इनोव्हेशन अ‍ॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेसचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.विशेष म्हणजे यंदा देशभरातील ४३०२ शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्यावर्षी मात्र केवळ ४३४ शहरांमध्येच हे सर्वेक्षण झाले होते. यावर्षी शहरांची यादी क्रमानुसार जाहीर न करता कॅटेगरी व झोनच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. तत्कालीन मनपा आयुक्त व सध्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान अतिशय परिश्रम घेतले होते. ५० हजाराच्या जवळपास लोकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले होते. डोअर टू डोअर कचरा कलेक्शनपासून तर रेल्वे, बस स्टॅँडपर्यंतची स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान करण्यात आली होती.एकूण शहरांच्या यादीमध्ये यंदा टॉप थ्री शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. इंदूरला सलग दुसऱ्या वर्षी सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले. भोपाळ दुसऱ्या आणि चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीत ५२ अवॉर्ड देण्यात आले. यात नागपूरला इनोव्हेशन कॅटेगरीत हा पुरस्कार मिळाला. तीन ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये इनोव्हेशन अवॉर्ड उत्तर प्रदेशातील अलीगड आणि एक ते तीन लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात झारखंडमधील अंबिकापूर शहराला इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला.मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले की, जीपीएस घड्याळासाठी नागपूरला इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला आहे. इतर बाबतीतही शहराचे प्रदर्शन चांगले राहिले. यंदा स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली नाही. वेगवेगळ्या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. नागपूरचे प्रदर्शन समाधानकारक राहिले. कारण तब्बल ४२०३ शहरांमध्ये स्पर्धा होती.गेल्या वर्षी मिळाले होते ५७.९५ गुणयंदा नागपूर शहराला किती गुण मिळाले, ते जाहीर करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षी नागपूर मनपाला २ हजार गुणांपेकी ११५९ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ५७.९५ टक्के इतकी होती. कचऱ्याचे कलेक्शन आणि वाहतुकीत नागपूरला ३६० पैकी २९३ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ही ८१.३९ इतकी होती. गेल्या वर्षी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडच्या बाबतीत नागपूरचे प्रदर्शन अतिशय वाईट होते. १५० पैकी केवळ २० गुण मिळाले होते. त्यामुळेच यंदा स्वच्छता अ‍ॅपकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. ५० हजाराच्या जवळपास लोकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केला होता.नागरिकांचे अभिनंदनस्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला यश आल्याने अतिशय आनंदी आहे. यासाठी सर्वांनीच अतिशय परिश्रम घेतले. मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच नागरिक आणि मीडियाचीही महत्त्वाची भूमिका राहिली. मनपाने चांगले काम केले. त्यामुळेच आजचे यश मिळाले. त्यामुळे सर्वांचेच विशेषत: नागपूरकर नागरिकांचे विशेष अभिनंदन.अश्विन मुदगलजिल्हाधिकारी

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर