शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  ऑटोचालक गुंडाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 20:08 IST

ऑटोचालक गुंडांमधील वादाचे पर्यवसान एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला. शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावलीतील कमाल चौकाजवळ ही थरारक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देपाचपावलीत थरार : तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  ऑटोचालक गुंडांमधील वादाचे पर्यवसान एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला. शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावलीतील कमाल चौकाजवळ ही थरारक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.गौरव ऊर्फ पांड्या पिल्लेवान (वय ३०, रा. लष्करीबाग) असे मृताचे नाव आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. आरोपी योगीराज धनविजय (वय ३५), विशाल विश्वकर्मा (वय ३८) आणि गोलू अंकुश मंडाले (वय २१) तसेच त्यांचे साथीदार हे देखील गुन्हेगारी वृत्तीचे असून ते पाचपावलीत ऑटो चालवितात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून वर्चस्वाचा वाद आहे. त्यातून त्यांच्यात अनेकदा कुरुबुरी होत होत्या. १५ दिवसांपूर्वी पांड्या आणि आरोपींमध्ये असाच वाद झाला. त्यावेळी त्यांनी एकमेकांना धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री कमाल चौकाजवळच्या शनिचरा मार्केटच्या बाजूला आरोपी उभे होते. तेवढ्यात पांड्या तेथून ऑटो घेऊन जात होता. एकमेकांकडे नजर रोखल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी पांड्यावर हल्ला चढवून त्याला दगडाने ठेचून मारले. अनेकांनी हा प्रकार बघितला मात्र त्यांच्या वादात पडण्याऐवजी अनेक जण पळून गेले. काही वेळेनंतर आरोपींपैकी योगीराज धनविजय स्वत:च पोलिसांकडे गेला आणि त्याने पांड्याचा गेम केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींची शोधाशोध करून मध्यरात्री पोलिसांनी उपरोक्त तिघांना अटक केली. ऑटोचालक, गुंडगिरी आणि खंडणी वसुली याबाबतीत कमाल चौकात वानखेडेचे नाव चर्चेला आहे. तिकडचे अनेक गुंड सध्या वानखेडेच्या प्रभावात असून, पांड्याचा गेम करणारे आरोपीसुद्धा वानखेडेचे साथीदार असल्याचे सांगितले जाते. मात्र, या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे की नाही, ते स्पष्ट होऊ शकले नाही. वृत्त लिहिस्तोवर पोलीस त्याची चौकशी करीत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून