शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:58 IST

झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींगच्या घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन करून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसंविधान चौकात आंदोलन : झारखंडच्या घटनेतील दोषींविरुद्ध कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींगच्या घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन करून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.झारखंडमध्ये जमावाने मुस्लिम युवक तबरेज अन्सारीला बांधून रात्रभर लाठ्यांनी मारहाण केली. त्याला जबरदस्तीने जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले. त्यानंतर रुग्णालयात तबरेजचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात याविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. नागपुरातही मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी मॉब लिंचींगच्या वाढत्या घटनांबाबत शासनातर्फे चुप्पी साधण्यात येत असल्याबाबत विरोध दर्शविला. यावेळी मुफ्ती मोहम्मद फारुख म्हणाले, झारखंडसह अनेक राज्यात मॉब लिंचींग करण्यात येत असल्यामुळे मुस्लिमांचा जीव जात आहे. धर्माच्या नावाने आतंकवाद वाढत आहे. परंतु शासन या विरुद्ध ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. मॉब लिंचींगच्या घटना थांबविण्यासाठी कायदा तयार करण्याची गरज आहे. परंतु शासन या निंदनीय घटनेचा निषेध करून उपाययोजना करण्यावरही बोलत नाही. यामुळे भारतीय जनता पक्ष मॉब लिंचींगच्या घटनांना पाठिंबा देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी मॉब लिंचींगवर अंकुश लावण्यासाठी पुढाकार घेतला तरच ते सर्वांचा विश्वास जिंकू शकतील, असे त्यांनी सांगितले. मुस्लिम समाज अशी गुंडागर्दी सहन करणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. डॉ. अनवर सिद्धीकी यांनी मॉब लिंचींगच्या घटनेचा निषेध करून शासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. निदर्शने आंदोलनात मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ, एमपीजे, दक्षिणायन संघटना, इंडियन युनियन मुस्लिम लीग, जमियत उलेमा हिंद या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामाजिक, राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने मॉब लिंचींग करून तबरेजचा खून करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यावेळी एमआयएमचे शहर अध्यक्ष नौशाद अली हैदरी, मो. जावेद निलो, मो. आरिफ गौरी, मो. इरशाद शेरु, जमात इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष डॉ. अनवर सिद्धीकी, शफिक अहमद, एमपीजे नागपूरचे जिल्हाध्यक्ष कबीरुद्धीन खान, दक्षिणायनच्या प्रज्वला कट्टे, रुबीना पटेल, एमपीजेचे अध्यक्ष शकील मोहम्मदी आदी संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Muslimमुस्लीमagitationआंदोलन