लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीनजिक चोरट्यांनी गुरुवारी दुपारी धावत्या कंटेनरवर चढून त्यातील साहित्य लंपास केले. चालक चंद्रपाल माधवसिंग ठाकूर (३७, रा. चौसिंगी, ता. बहाव, जिल्हा आग्रा) व क्लिनर रोहित राममुरत पासवान (१८, रा. आलेमहू, ता. फुलपूर जिल्हा अलाहाबाद) हे वडधामना येथील टीसीआय एक्स्प्रेस येथून कापड, बनारसी साड्या, विद्युत उपकरणे यासह अन्य साहित्याचे पार्सल जीजे-०१/ईटी-२७४५ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये घेऊन गांधीनगरकडे निघाले होते. कोंढाळी परिसरात या कंटेनरमधील साहित्य लंपास केले जात असल्याची माहिती ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकचालकाने कंटेनरचालकास दिली. त्यामुळे चालकाने खुर्सापार मदत केंद्राजवळ कंटेनर थांबवून तपासणी केली असता, त्यातील पार्सल चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. परिणामी, त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत या कंटेनरमधील पार्सल खाली काढून त्यांची मोजणी केली. त्यात २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर करीत आहेत.घटनास्थळाबाबत संभ्रमचोरट्यांनी धावत्या कंटेनरमधून साहित्य चोरून नेले. ही बाब कंटेनरचालकास कोंढाळी परिसरात निदर्शनास आली. चोरट्यांनी साहित्य नेमके कोणत्या शिवारातून पळविले, याबाबत चालकासही माहीत नाही. त्यामुळे घटनास्थळाबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यात चोरांनी कंटेनरमधील नेमके कोणते पार्सल चोरून नेले आणि त्यांची किंमत किती, हेही स्पष्ट झाले नाही. नागपूर-अमरावती महामार्ग २४ तास वर्दळीचा असताना ही घटना घडली. त्यामुळे या घटनेबाबत नवल व्यक्त केले जात आहे.
नागपूर-अमरावती महामार्गावर धावत्या कंटेनरमधील साहित्य पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:42 IST
नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीनजिक चोरट्यांनी गुरुवारी दुपारी धावत्या कंटेनरवर चढून त्यातील साहित्य लंपास केले.
नागपूर-अमरावती महामार्गावर धावत्या कंटेनरमधील साहित्य पळवले
ठळक मुद्देअडीच लाखांचा ऐवज लंपास