शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: दुर्देवी! थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली, दोन भावंडाचा होरपळून मृत्यू

By योगेश पांडे | Updated: January 19, 2024 00:18 IST

Nagpur News: एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा जळून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली.

- योगेश पांडेनागपूर - एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा जळून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली. घरात ज्यावेळी आग लागली तेव्हा तेथे त्यांची मोठी बहीणदेखील होती. तिचा जीव वाचला मात्र दोन भावांचे डोळे नेहमीसाठी मिटले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

देवांश रंजित उईके (७) व प्रभास उईके (३) अशी मृत भावंडांची नावे आहे. ते त्यांची आई दिपाली हिच्यासोबत एका कच्च्या घरात रहायचे. त्यांना एक मोठा भाऊ व १० वर्षीय बहीणदेखील आहे. आई दिपाली कामानिमित्त बाहेर गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार रात्री थंडी असल्यामुळे मुलांनी घरात शेकोटी पेटवली. मात्र त्यामुळे घरात आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली. घर वस्तीपासून काहीसे बाजुला असल्याने चिमुकल्यांचा आरडाओरडा लोकांना ऐकूदेखील गेला नाही. त्यांच्या बहिणीने कसाबसा बाहेर पळ काढला. मात्र देवांश व प्रभास हे आगीच्या विळख्यात सापडले. काही वेळातच त्यांचा जळून मृत्यू झाला. दरम्यान मुख्य रस्त्यावरून एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले. त्याने धाव घेतली असता हा प्रकार लक्षात आला. अग्निशमन विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. दोन्ही भावांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. उपायुक्त राहुल मदने, गिट्टीखदानचे ठाणेदार महेश सांगळे, हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर