शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळ ‘जीएमआर’कडे : पाच कंपन्यांच्या आल्या होत्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:44 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर निघाला आहे. वित्तीय निविदेच्या आधारावर ‘जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड’ या कंपनीकडे विमानतळाच्या विकासाचा ताबा देण्यात येणार आहे. साधारणत: पुढील महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल व विमानतळाच्या विकासाची सूत्रे ‘जीएमआर’कडे सोपविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २००९ मध्ये नागपूर विमानतळ ‘एएआय’कडून ‘एमएडीसी’कडे हस्तांतरित झाल्यानंतर आतापर्यंत खासगीकरण अडकले होते.

ठळक मुद्देतब्बल नऊ वर्षांनंतर निघाला खासगीकरणाचा मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर निघाला आहे. वित्तीय निविदेच्या आधारावर ‘जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड’ या कंपनीकडे विमानतळाच्या विकासाचा ताबा देण्यात येणार आहे. साधारणत: पुढील महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल व विमानतळाच्या विकासाची सूत्रे ‘जीएमआर’कडे सोपविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २००९ मध्ये नागपूर विमानतळ ‘एएआय’कडून ‘एमएडीसी’कडे हस्तांतरित झाल्यानंतर आतापर्यंत खासगीकरण अडकले होते.जून २००६ मध्ये संयुक्त कंपनी मिहान इंडिया लिमिटेडची नोंदणी झाली आणि आॅगस्ट २००९ मध्ये एमआयएलने विमानतळ संचालनाची जबाबदारी सांभाळली. जवळपास आठ वर्षांनंतर गेल्या वर्षी ‘आरएफक्यू’ (रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन) निविदा काढण्यात आल्या. पूर्वप्रक्रियेत पात्र भागीदारांमध्ये ‘जीव्हीके’, ‘जीएमआर’, ‘टाटा रियल्टी’, ‘एस्सेल इन्फ्रा’, ‘पीएनसी इन्फ्रा’ इत्यादी कंपन्यांचा समावेश होता, तर अंतिम निविदेसाठी ‘जीएमआर’ व ‘जीव्हीके’मध्ये स्पर्धा होती. वित्तीय निविदेच्या आधारावर विमानतळाला सर्वाधिक महसूल देणारी कंपनी म्हणून ‘जीएमआर’ला कंत्राट देण्यात आले. ‘पीपीपी’वर आधारित असलेल्या खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ ‘जीएमआर’कडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया ‘एमआयएल’च्या (मिहान इंडिया लिमिटेड) माध्यमातून राबविण्यात येत आहे. खासगीकरणानंतर नागपूर विमानतळ सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर उभारण्याची योजना असून, त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या विमानतळावर जवळपास २० विमाने राहण्याची क्षमता आहे. विकासानंतर त्याची क्षमता वाढणार आहे.‘जीएमआर’ची ७४ टक्के भागीदारीविमानतळ विकासासाठी निवड झालेली ‘जीएमआर’ कंपनी आणि ‘एमआयएल’ यांची विशेष कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. १६८५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात निवड झालेल्या ‘जीएमआर’ची ७४ टक्के आणि ‘एमआयएल’ची २६ टक्के भागीदारी राहील. खासगीकरणात आमची निवड झाली, ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे. नागपूर विमानतळाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिवाय या माध्यमातून विदर्भाच्या विकासासाठीदेखील आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत ‘जीएमआर’चे चेअरमन जी.बी.एस.राजू यांनी व्यक्त केले.नवीन ‘टर्मिनल’ बांधण्याचे आव्हानखासगीकरणाच्या प्रकल्पात ३० वर्षांसाठी विमानतळाचे आधुनिकीकरण, संचालन आणि देखरेख यांचा समावेश राहणार आहे. सोबतच नवीन ‘टर्मिनल’ इमारत बांधण्याच्या कामाचादेखील यात समावेश आहे. ‘जीएमआर’कडे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह हैदराबाद, फिलिपिन्स, ग्रीस इत्यादी ठिकाणच्या विमानतळांच्या देखरेख व संचालनाची जबाबदारी आहे.काय आहे नागपूर विमानतळाची क्षमता-२०१७-१८ मध्ये नागपूर विमातळावर २१ लाख ८० हजार प्रवासी आले तर ७८०० मेट्रिक टन ‘कार्गो’ उतरले. मागील पाच वर्षांत प्रवासी वाहतूक ११ टक्क्यांनी वाढली आहे. देशात नागपूर विमानतळाचा ‘कार्गो’ प्रवासाच्या दृष्टीने १७ वा क्रमांक लागतो.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर