शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे होणार ‘रिकार्पेटिंग’

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 12, 2024 20:53 IST

भारतीय विमानतळ प्राधिकरण कंत्राटदार व वेळापत्रक एप्रिलमध्ये जाहीर करणार

नागपूर : तब्बल दहा वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘रिकार्पेेटिंग’ अर्थात धावपट्टीची दुरुस्ती आणि त्यावर थर टाकण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

‘रिकार्पेटिंग’ची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची उपकंपनी मिहान इंडिया लिमिटेडने (एलआयएल) भारतीय विमानतळ प्राधिकरणावर (एएआय) सोपविली आहे. त्यानुसार एएआय निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदाराचा शोध घेऊन तारीख निश्चित करणार आहे. या प्रक्रियेवर एप्रिल महिन्यात शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. दहा वर्षांनंतर कोणत्याही विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती आणि त्यावर पुन्हा थर टाकण्यात येते. याची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविण्यात येते. त्यानुसार नागपूर विमानतळाचे नूतनीकरण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. जानेवारीत झालेल्या एका बैठकीत एमएडीसीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी हे कार्य एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले होते.

निविदा प्रक्रिया सुरूनागपूर विमानतळाची दुरुस्ती आणि धावपट्टीच्या नूतनीकरणासाठी दुपारी १.३० ते ३.३० हा वेळ राखीव आहे. कारण या वेळेत कोणत्याही विमानाची ये-जा नसते. रिकार्पेटिंगसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. हे कार्य कोणती कंपनी करेल, किती खर्च येईल आणि किती वेळ लागेल, याची माहिती प्रक्रियेच्या पूर्णत्वानंतरच कळणार आहे.

दहा वर्षांत होते रिकार्पेटिंगधावपट्टीची दुरुस्ती आणि त्यावर नव्याने थर टाकण्याचे कार्य दहा वर्षांनी करण्यात येते. हे कार्य करीत असताना विमान सेवेवर परिणाम होतो. विमानाचे लॅण्डिंग आणि टेक-ऑफवर मर्यादा येतात. हे कार्य करीत असताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा सामना करावा लागू नये, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.

रिकार्पेटिंगचे कार्य एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हे काम भारतीय विमानतळ प्राधिकरण करणार आहे. याकरिता निविदा प्रक्रिया सुरू आहे.- आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

टॅग्स :nagpurनागपूर