शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एअरलाईन्सच्या तणावग्रस्त कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:19 IST

नागपूर विमानतळावरील गो-एअरलाईन्सच्या एका तणावग्रस्त तरुण कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देगो-एअरमध्ये होता सीएसए : आजारी असूनही अधिकारी वारंवार बोलवायचे कामावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विमानतळावरील गो-एअरलाईन्सच्या एका तणावग्रस्त तरुण कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंथन महेंद्र चव्हाण (१९) रा. चंद्रमणीनगर असे मृताचे नाव आहे. तो कस्टमर सर्व्हिस एजंट (सीएसए) म्हणून कामावर होता. कामाच्या टेन्शनमुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. ही घटना गुरुवारी दुपारी २.४५ वाजता घडली. मंथन आजारी होता, तरीही अधिकारी त्याला वारंवार कामावर येण्यास सांगत होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून तणावात होता.मृत मंथनचे वडील महेंद्र चव्हाण हे शास्त्री चौकातील कीर्ती डायग्नोसिस सेंटरमध्ये एक्स-रे टेक्निशियन आहेत तर आई सुषमा पोलीस विभागात विशेष शाखेत कार्यरत आहे. त्याच्या मित्रानुसार मंथनला नोकरीवर लागून एक वर्ष होत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तो नोकरी सोडण्याच्या विचारात होता. त्याला कावीळ झाला होता. त्यामुळे मंथन एक आठवड्यापासून सुटीवर होता. त्याचे मेडिकल रिपोर्टही कंपनीला देण्यात आले होते. यानंतरही त्याला वारंवार ड्युटीवर बोलावले जात असल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांचेही म्हणणे आहे की, तो वैद्यकीय रजेवर असूनही नोकरीच्या टेन्शनबाबत बोलत होता. गुरुवारी दुपारी ३ वाजता मंथन त्याच्या खोलीत फासावर लटकलेला आढळून आला.सुसाईड नोट सापडलेमंथनच्या मित्रांनुसार तो काही दिवसांपासून नोकरीबाबत खूप त्रस्त होता. याबाबत त्याने आपल्या मित्रांनाही अनेकदा सांगितले होते. त्याने गळफास घेतल्यानंतर त्याच्या खोलीत मंथनने लिहिलेले सुसाईड नोटही सापडले आहे. त्यात त्याने आई सुषमा यांची आत्महत्येसाठी माफी मागितली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याAirportविमानतळEmployeeकर्मचारी