शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

नागपुरात पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 21:34 IST

अवैध सावकाराने दीड लाख रुपयांच्या बदल्यात गहाण ठेवलेली इनोव्हा कार परस्पर विकून टाकल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेतून पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देमहिन्याला १० टक्के व्याज : दीड लाखाच्या बदल्यात इनोव्हा हडपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकाराने दीड लाख रुपयांच्या बदल्यात गहाण ठेवलेली इनोव्हा कार परस्पर विकून टाकल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेतून पुन्हा एक अवैध सावकारी प्रकरण उघडकीस आले आहे.सतीश धारगावे (वय ४५) असे या प्रकरणातील आरोपी सावकाराचे नाव आहे. तो जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशीनगरात राहतो. गोपालनगरातील राजेश पुरुषोत्तम बोरकर (वय ५१) यांना मुलीच्या शिक्षणाकरिता सप्टेंबर २०१७ मध्ये पैशाची निकड असल्यामुळे त्यांनी रमन रामटेके याच्या मदतीने आरोपी सावकार सतीश धारगावे यांच्याकडून दीड लाख रुपये दहा टक्के महिना व्याजाने घेतले. यावेळी बोरकर यांच्या आरोपीने कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या आणि गहाण म्हणून त्यांची इनोव्हा कार स्वत:कडे ठेवून घेतली. चार महिन्यांनंतर बोरकर यांनी रक्कम परत करण्यासाठी धारगावेसोबत संपर्क केला. त्याची रक्कम परत करून आपली कार वापस मागितली असता आरोपीने कार देण्यासाठी टाळाटाळ केली. तुला दिलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज लागले असून कार परत मिळणार नाही, असे आरोपी म्हणाला. दरम्यान, आरोपी सतीशचा भाऊ नितीन धारगावे याने ओएलएक्स अ‍ॅपवर बोरकर यांची कार विकण्याची जाहिरात टाकली. त्यानंतर पायल मोटरचे एजंट अतुल इंगळे यांच्याशी संगनमत करून धारगावे बंधू आणि इंगळे यांनी नंदनवनमधील राजेंद्र दहीकर याला ही कार परस्पर विकून टाकली. ही बाब लक्षात आल्यानंतर बोरकर यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी फसवणुकीच्या तसेच अवैध सावकारीच्या कायद्यानुसार आरोपी सतीश आणि नितीन धारगावे तसेच अतुल इंगळेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसा